महाराष्ट्र
समृद्धीवर मिनीबस पेटली; चालकाचे प्रसंगावधान, 20 जण सुखरूप बचावले
By Admin
समृद्धीवर मिनीबस पेटली; चालकाचे प्रसंगावधान, 20 जण सुखरूप बचावले
नाशिक - प्रतिनिधी
हिंदुरुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर मुंबई कडून नागपूरच्या दिशेने यवतमाळ कडे जाणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हलर मिनी बसने सिन्नर तालुक्यातील सोनांबे शिवारात पेट घेतल्याची घटना रविवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास घडली.
चालकाने प्रसंगावधान दाखवत बसमधील सर्व प्रवाशांना खाली उतरवल्याने मोठी जीवितहानी टाळली. आगीच्या या घटनेत टेम्पो ट्रॅव्हलर मिनीबस जळून खाक झाली.
सोनंबे शिवारात नागपूरच्या दिशेने जाणाऱ् याकॅरीडोर किलोमीटर क्रमांक 579 च्या दरम्यानचा पहाटे चार वाजेच्या सुमारास फोर्स कंपनीची टेम्पो ट्रॅव्हलर मिनीबस MH04 AG 1930 च्या इंजिन मधून धूर निघू लागला.
काही करायच्या आत आगीचा भडका उडाला. ओमप्रकाश शुक्ला (वय 27) रा. यवतमाळ याने क्षण न दवडता मिनी बस मधील सर्व प्रवाशांना सुखरूपपणे खाली उतरवले. चालकाने आपत्कालीन क्रमांकावर मदतीसाठी संपर्क साधला असता छत्रपती संभाजी नगर येथील नियंत्रण कक्षातून शिर्डी, गोंदे, भरवीर फाटा एसएमबीटी टोल प्लाझा येथील मदत पथकांना सुचित करण्यात आले.
महाराष्ट्र सुरक्षा रक्षक पथकाचे गोंदे सिन्नर टोल प्लाझा येथील निरीक्षक मिलिंद सरवदे, महामार्ग सुरक्षा विभागाचे पोलीस उपनिरीक्षक दोडे, मनोज कोटकर यांनी बचाव पथकासह घटनास्थळ गाठले. भरवीर फाटा इगतपुरी येथील बचाव पथके देखील तात्काळ दाखल झाली. सिन्नर येथून अग्निशमन दलाचा बंब पाचारन करण्यात आला. या बंबाच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. मात्र तोपर्यंत संपूर्ण बस जळून खाक झाली होती.
या घटनेत मिनीबस मधील सर्व प्रवासी सुरक्षित असले तरी त्यांच्याजवळील साहित्य जळून खाक झाले. हे सर्व प्रवासी मुंबई येथून यवतमाळ कडे जात असल्याचे चालकाने सांगितले.
हजत्रेसाठी जाणाऱ्या नातेवाईकांना मुंबई विमानतळावर पोहोचवण्यासाठी सर्व प्रवासी आले होते. हजयत्रींना निरोप दिल्यानंतर या सर्वांनी मुंबईमध्ये फिरण्याचा आनंद घेतला. रात्री पुन्हा यवतमाळच्या दिशेने रवाना झाले होते.
वाहनाला आग लागली त्यावेळेस बसमधील सर्वच प्रवासी साखर झोपेत होते. मात्र चालकाच्या प्रसंगावधानामुळे सर्वांचे प्राण वाचले.
सोबत असणारे प्रवाशी-
नर्गिस जहाँ -40, रुमान मलिक -20, मोहम्मद इरफान -38, नाझिया परवीन -30, झियान मलिक -18, मोहम्मद सैफ -10, मोहम्मद फरहान -35, नजम शाहीन -30, मोहम्मद अबुझर 7, मोहम्मद खालिद -6, मोहम्मद अब्दुल रहमान 5, मोहम्मद साबीर 45, नुझहत परवीन 40,रमशा साबीर-21, अली उमर-20, मुजेश अहमद -45, नुसरत परवीन-38, दरक्षा गोहन -18, मुशिर अहमद-8
Tags :
2300
10