कवडदरा विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप
नाशिक- प्रतिनिधी
इगतपुरी तालुक्यातील कवडदरा येथील भारत सर्व सेवा संघ शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल व ज्यूनिअर काॕलेज कवडदरा विद्यालयात इयत्ता दहावीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना निरोप तसेच एस एस सी बोर्ड परीक्षेसाठी शुभेच्छा कार्यक्रम शनिवार दि.१५ फेब्रुवारी रोजी सकाळी ०८ ते ११ वाजेपर्यंत उत्साहात संपन्न झाला.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे प्राचार्य- मुख्याध्यापक व्हि.एम.कांबळे यांच्या सरस्वती पुजन करुन श्रीफळ फोडून कार्यक्रमाला सुरवात झाली.
यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षक कर्मचारी यांचा गुलाब फुल व पेन देवून सत्कार व सन्मान करण्यात आला. विद्यालयातील इयत्ता ५ वी ते ९ वीच्या विद्यार्थ्यांनी तसेच विद्यालयातील मुख्याध्यापक तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांविषयी आपल्या मनोगतात भावना व्यक्त करत विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.
तसेच इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा संदर्भात मार्गदर्शनपर माहीती दिली.तसेच पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी दहावीच्या विद्यार्थ्यांनी विद्यालयासाठी भेटवस्तू दिल्या.दहावीत शिकणा-या विद्यार्थ्यांनी विद्यालय व शिक्षकांविषयी शिक्षण घेत असताना आपल्या भावना व्यक्त केल्या.
आनंदमय वातावरणात दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप कार्यक्रम संपन्न झाला.यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.