पाथर्डी- प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील हनुमान टाकळी गावचे ग्रामपंचायत सदस्य, आदिनाथ नागरी सहकारी पतसंस्थाचे व्हा. चेअरमन, समाजातील एक आदर्श पुरोषोत्तम व्यक्तीमत्व, स्वभावाने मनमिळाऊ,बोलके,सालस, सोज्वळ तसेच राजकारणात कडक आणि शिस्तीचे पालन कर्ते याशिवाय ज्यांचा वक्तशीरपणा हा जिवनाचा स्थायी भाव होता असे कै. आसाराम राधाकृष्ण गायकवाड यांच्या पंधराव्या स्मृतिदिनानिमित्त आज दिनांक २३/९/२०२५ रोजी मतिमंद मुलांचे निवासी वसतिगृह मोहरी ता पाथर्डी या शाळेतील विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजनाचे आयोजन केले होते.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते बंडू बर्डे(चेअरमन) हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून शुभम ( मोना) बर्डे, झावरे सर, खताळ सर, कोलते सर, अनिल गवते,अमोल साळवे आदी उपस्थित होते.यावेळी बोलताना प्रहार दिंव्यांग संघटनेचे जिल्हा समन्वयक विठ्ठल गायकवाड म्हणाले की, आम्ही आमच्या वडिलांच्या चांगल्या विचारांचा वारसा पुढे घेऊन जात असताना समाजातील वंचित घटकांसाठी आमच्या ऐपतीप्रमाणे काम करत आहोत.
हिच खरी आमच्या वडिलांना आदरांजली असून पूण्यतिथी किंवा जयंती अशाच मानसाची साजरी होते जी मानसं समाजासाठी जगली. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून समाजासाठी आपण काहीतरी देणं लागतो म्हणून दर वर्षी त्यांच्या आठवणींना उजाळा मिळावा म्हणून आम्ही दर वर्षी नवनवीन कार्यक्रम घेऊन समाजाप्रती असलेली उतराई कमी करण्यासाठी प्रयत्नशील असतोत.
यावेळी विष्णू गायकवाड यांनी मनोगत व्यक्त करतांना मुलांना चमत्कार करून विद्यार्थ्यांचे मनोरंजन केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुकुंद गायकवाड, नवनाथ गायकवाड, प्रणव गायकवाड यांनी परिश्रम घेतले.
सुत्रसंचलन मेंगनर सर यांनी केले.आभार मुकुंद गायकवाड यांनी मानले.