कवडदरा विद्यालयात धामणगाव बीट स्तरीय स्पर्धा संपन्न
By Admin
कवडदरा विद्यालयात धामणगाव बीट स्तरीय स्पर्धा संपन्न
कवडदरा -
इगतपुरी तालुक्यातील कवडदरा येथील भारत सर्व सेवा संघ शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल व ज्यूनिअर काॕलेज कवडदरा विद्यालयात धामणगाव केंद्र बीट स्तरीय स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या. जिल्हा परीषद अध्यक्ष चषक बीट धामणगाव केंद्रातील असणाऱ्या जिल्हा परीषद प्राथमिक शाळातील विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभागी झाले होते.यामध्ये विद्यार्थ्यांच्या विविध कलागुण दर्शन कार्यक्रम संपन्न झाला.
कार्यक्रमासाठी सामाजिक कार्यकर्तै बाळासाहेब गाढवे, पांडुरंग वारगुंसे, भुषण डामसे, गणेश रोंगटे,विस्तार अधिकारी सोनवणे साहेब, केंद्र प्रमुख दराडे सर, कवडदरा हायस्कूलचे प्राचार्य-मुख्याध्यापक बी.एस.पवार,जि.प.शाळेचे सर्व मुख्याध्यापक व शिक्षक,पञकार अमोल म्हस्के,दगडु तेलोरे सर, यावेळी उपस्थित होते.कार्यक्रमाचे अध्यक्ष बाळासाहेब गाढवे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पुजन करुन कार्यक्रमाला सुरवात झाली.विद्यार्थ्यांनी सुरवातीला शपथ घेतली.यावेळी उपस्थित मान्यवरांचा विस्तार अधिकारी व केंद्र प्रमुख यांच्या हस्ते फुल व शाल सत्कार सन्मान करण्यात आला. पञकार दिनानिम्मित पञकार अमोल म्हस्के यांचा सत्कार करण्यात आला.
विद्यार्थ्यांनी आपल्या विविध कलागुण दर्शन दाखवून आपल्या सुप्त कलेला वाव द्यावा.खेळामुळे आपला शारीरिक व्यायाम होते.तसेच वकृत्व स्पर्धा मुळे भाषण कौशल्य वाढते.असे पांडुरंग वारघुंसे यांनी यावेळी सांगितले.
शालेय शिक्षण घेत असताना विविध स्पर्धेत सहभाग घेणे गरजेचे आहे.प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये विविध कला गुण असतात.ते प्रत्यक्ष दाखवणे महत्त्वाचे आहे.बीट स्तरीय स्पर्धेमुळे शाळेतील मुलांचा उत्साह वाढत आहे.जिल्हा परीषद शाळेचे नवीन उपक्रम खूप चांगले आहेत.
यावेळी १०० मी.धावणे,२०० मी.धावणे,कबड्डी,खो-खो,चिञकला स्पर्धा,वकृत्व स्पर्धा,नृत्य गायन,समुह नृत्य या स्पर्धा विद्यार्थ्यांनी आपले कलागुण सादर केले.यावेळी कबड्डी व खो-खो खेळातून चांगली पंच म्हणून काम योग्य संघ निवड केली.वकृत्व ,समुह नृत्य यातून योग्य विद्यार्थ्यांची निवड केली.यावेळी विद्यार्थ्यांचा उत्साह महत्त्वपुर्ण होता.प्रथम,व्दितीय,तृतीय क्रमांक मिळवणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपञ देऊन सन्मान करण्यात आला.
10479
10




