शिक्षकांच्या मदतीने कोरोना विरोधी लढाईत बळ मिळाले- नामदार प्राजक्त तनपुरे
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी -03 मे 2021
राज्यात कोणाचा प्रचंड प्रादुर्भाव होत आहे .रुग्णालय ओसंडून वाहत आहेत .अशा वेळी ऑक्सीजन बेडच्या अभावामुळे रुग्णांचे हाल होत आहेत .कोरोना विरोधी लढाई कुठलाही एक लोकप्रतिनिधी ,व्यक्ती अथवा संस्था जिंकू शकत नाही .राहुरीतील जिल्हा परिषद शिक्षकांच्या मदतीमुळे या लढाईत मोठे बळ मिळाले असे गौरवोद्गार नामदार प्राजक्त तनपुरे यांनी काढले.
प्राथमिक शिक्षकांचे वतीने कोविड रिलीफ फंडसाठी मदतीचा धनादेश स्वीकारताना ते बोलत होते .
सर्वसामान्य रुग्णांना ऑक्सिजन बेडसाठी मदत व्हावी या सामाजिक जाणिवेतून राहुरीतील प्राथमिक शिक्षकांनी निधी संकलित केला .सर्व केंद्रांतून फोनपे च्या माध्यमातून रुपये सहा लाख 59 हजार 358 इतका निधी जमा झाला आहे .नुकताच त्यातील पाच लाख अकरा हजार इतका निधी धनादेशाद्वारे नामदार प्राजक्त तनपुरे यांना सुपूर्द करण्यात आला. उर्वरित निधी मधून तालुक्यातील इतर covid-19 सेंटरला मदत करण्याचा मानस यावेळी शिक्षकांनी व्यक्त केला
रुपये अकरा हजार एवढी भरीव देणगी दिल्याबद्दल गटशिक्षणाधिकारी सुनील सूर्यवंशी यांचा नामदार तनपुरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .शिक्षकांच्या स्वयंस्फूर्त मदतीमुळे समाधान वाटले .आपण दाखवलेले सामाजिक भान कौतुकास्पद आहे.यामुळे समाजातील इतर घटकांना प्रेरणा मिळेल .असें आमदार तनपुरे पुढे म्हणाले .
कोरोना विरोधी लढाईत विद्यार्थी विद्यार्थ्यांनी ही उडी घेतली असून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा त्रिंबकपूरच्या बालकांनी रुपये पाच हजाराची मदत फंड साठी दिली आहे .
याप्रसंगी जिल्हा परिषद शिक्षण समिती सदस्य धनराज गाडे ज्येष्ठ नेते सुरेश निमसे पंचायत समितीचे माजी उपसभापती रवींद्र आढाव माजी उपसभापती बाळासाहेब लटके युवा नेते अण्णासाहेब सोडनर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संतोष आघाव तसेच गटशिक्षणाधिकारी सुनील सूर्यवंशी उपस्थित होते