भारतीय संविधानाचा आदर जगभर केला जातो- प्रा. शेखर ससाणे
बाबूजी आव्हाड महाविद्यालयात संविधान दिन उत्साहात
पाथर्डी प्रतिनिधी:
येथील बाबूजी आव्हाड कनिष्ठ महाविद्यालयामध्ये संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला.२६ नोव्हेंबर १९४९ रोजी राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना समितीचे अध्यक्ष डॉ.राजेंद्र प्रसाद यांना पहिला मसुदा दिला होता. हा ऐतिहासिक दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. या घटनेला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याबद्दल महाविद्यालयामध्ये संविधान दिनाचे उत्साहाने आयोजन करण्यात आले.
या निमित्त प्रा.शेखर ससाणे यांनी संविधानाचे महत्त्व विद्यार्थ्यांना विशद करतांना म्हणाले,स्वातंत्र्य,समता, बंधुता, सामाजिक न्याय हे मूल्य रुजविणारे भारतीय संविधान महान असून जगातील सर्वात मोठ्या लिखित संविधानापैकी एक आहे. त्यामुळे भारतीय संविधानाचा आदर जगभर केला जातो. संविधानाचे निर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी शोषित, पीडित आणि वंचितांना न्याय हक्क या माध्यमातून मिळवून दिले.
याप्रसंगी प्रा.मन्सूर शेख यांनी संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन विद्यार्थ्यांद्वारे करून घेतले.
आभार प्रा. सुनिल कचरे यांनी मानले.याप्रसंगी महाविद्यालयातील सर्व शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.