'या' तलुक्यातील प्राथमिक शिक्षकांनी उभारलेल्या कोविड केअर सेंटरचे काम राज्यातील शिक्षकासाठी दिशा दर्शक
By Admin
'या' तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांनी उभारलेल्या 'कोविड केअर' सेंटर चे काम राज्यातील शिक्षकांसाठी दिशा दर्शक
नगर सिटीझन live प्रतिनिधी - 03 मे 2021 वार- सोमवारराज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या प्रेरणेतून व मार्गदर्शनातून अहमदनगर जिल्हा शिक्षण समितीचे सदस्य मिलिंद कानवडे व संगमनेर पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी साईलता सामलेटी यांनी 'कोविड सेंटर' ची संकल्पना मांडली. संगमनेर तालुक्यातील सर्व प्राथमिक शिक्षकांनी मानवतेच्या भावनेतून प्रतिसाद दिला. तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांचा निधी संकलन करतांना प्रत्येक केंद्रातील केंद्रप्रमुख ,तंत्रस्नेही शिक्षक व विविध शिक्षक संघटनेचे प्रतिनिधी यांनी मोलाचे सहकार्य केले.यातून चंदनापुरी येथे प्राथमिक शिक्षक व शिक्षण विभाग पंचायत समिती संगमनेर यांच्या वतीने शंभर बेडचे कोविड केअर सेंटरचे उदघाटन नाशिक पदवीधर विभागाचे आमदार सुधीर तांबे यांच्या हस्ते रुग्णांच्या सेवेसाठी उपलब्ध झाले.
महाराष्ट्र राज्यात प्राथमिक शिक्षकांनी सुरू केलेले असे पहिलेच सेंटर ठरले. संगमनेर तालुक्यात वाढत असलेली रुग्णसंख्या लक्षात घेता या सेंटरचा गरजूंना लाभ होत आहे. चार ते पाच दिवसातच पंचावन्न पेशंट येथे उपचार घेत आहे.
प्रांताधिकारी शशिकांत मंगरुळे व तहसीलदार अमोल निकम,गटविकास अधिकारी सुरेश शिंदे व तालुका वैद्यकीय अधिकारी सुरेश घोलप यांनी कर्तव्यदक्ष वैद्यकीय अधिकाऱ्यांची टीम उपलब्ध करून दिली. मेडिकल ऑफिसर डॉ. लोहारे डॉ.कवटे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली कामकाज चालू आहे.
संगमनेर तालुक्यातील इंजिनीयर असोसिएशन यांच्या वतीने येथील रुग्णांना अंडी दिली जात आहे. सदर अंडी सेंटर मध्ये पोचवण्याचे काम बाळासाहेब गुंजाळ सर करत आहेत. सेंटरचे समन्वयक के.के. पवार तसेच आर. पी .राहणे हे येथील बारीक-सारीक गोष्टीवर लक्ष देऊन जास्तीत जास्त रुग्णांना सेवा देण्यासाठी प्रयत्नशील आहेत. आर .पी .रहाणे सर रोज सकाळ , दुपार व संध्याकाळ माहिती घेऊन ती वरिष्ठांना देत असतात. स्वतः रुग्णां जवळ जाऊन त्यांची विचारपूस करून त्यांना धीर देण्याचे काम करत असतात. याकामी त्यांना शिवाजी आव्हाड, गौतम मिसाळ , माधव हासे, रवीन्द्र अनाप,नंदू राहणे,राजेंद्र कडलग, पोपट काळे व गवनाथ बोऱ्हाडे मदत करत असतात.
हे सेंटर उभारताना सिंधू लॉन्स चे मालक नरेंद्र राहणे यांनी आपले कार्यालय मोफत उपलब्ध करून दिले. तसेच मंडप व इतर काम ओमकार वाळे यांनी उपलब्ध करून दिले. ग्रामपंचायत चंदनापुरी यांच्या वतीने पाण्याचे जार रुग्णांसाठी उपलब्ध करून दिले. अण्णा राहणे यांनी दैनंदिन वापरावयाचे पाणी उपलब्ध करून देत आहेत. चंदनापुरी येथील रवींद्र सरोदे व सागर राहणे यांनी रुग्णांना रोज चहा आणि नाश्त्याची सोय केलेली आहे. झोळे गावातील विविध संस्था व ग्रामस्थ यांच्या वतीने पंचवीस बेड या सेंटर साठी उपलब्ध करून दिले. रुग्णांची ऑक्सीजन लेव्हल वाढवण्यासाठी रोज सकाळी योगा ,त्यांचे मानसिक स्वास्थ चांगले ठेवण्यासाठी समुपदेशन व त्यांचा वेळ सत्कारनी लावण्यासाठी वाचनालय इत्यादी नाविन्यपूर्ण उपक्रम सेंटरमध्ये शिक्षकांनी उपलब्ध करून दिले आहेत.
यावेळी सेंटर मधून डिस्चार्ज मिळालेल्या अश्विनी भालेराव हिने जाताना अभिप्राय दिला. 'मला व माझ्या कुटुंबाला कोरोना झाल्याने आम्ही पुण्यावरून आमच्या चंदनापूरी गावी आलो. आम्ही पॉझिटिव्ह असल्याने आम्हाला या सेंटर मध्ये दाखल केले. य