महाराष्ट्र
1037
10
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकाचे पंचनामे करा.- खा. डाॕ. सुजय विखे
By Admin
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकाचे पंचनामे करा.- खा. डाॕ. सुजय विखे
केंद्र सरकारच्या योजनेतून पूरग्रस्तांना मदतीचे आश्वासन
प्रशासकीय यंञणेला पंचनामा करण्याचा सुचना
पाथर्डी - प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील कोरडगाव,मुखेकरवाडी,कोळ सांगवी,कळस पिंपरी येथे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली.परीसरातील कपाशी,बाजरी,ऊस पिकाचे मोठे नुकसान पिकाची पाहणी केली.यावेळी परीसरातील अनेक शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा खासदार विखे यांना माडल्या.खा.विखे यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेवून त्याच्याशी संवाद साधला.परीसरातील अनेक लोकांचे संसार उपयोगी वस्तूचे तसेच जनावरे दगावली असल्याचे नुकसान झालेल्या कुटुंबीयांनी खा.विखेना सांगितले. अशा प्रकारचा पाऊस प्रथमच झाल्याचे
ग्रामस्थांनी सांगितले.
‘अतिवृष्टीमुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. शेतीसह जनावरांची प्रचंड जीवितहानी झाली आहे. अनेकांचे शेती अवजारे, संसार उपयोग वस्तू पाण्यात वाहून गेल्याने अनेक परिवार उघड्यावर आले आहेत. अशा संकटात आपण सोबत आहोत. केंद्र शासनाच्या योजनेतून पूरग्रस्तांसाठी मदत दिली जाईल,’ असे प्रतिपादन खासदार डॉ. सुजय विखे यांनी केले.
तालुक्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांना नुकसान झालेल्या राहत्या घराचे,शेतातील पिकाचे तातडीने पंचनामा करण्याच्या सूचना दिल्या. तसेच या भागातील नदीकाठी राहणाऱ्या लोकांच्या वस्तीच्या ठिकाणी भेट दिली.तसेच त्यांना सुरक्षित स्थळी पाठवले.तसेच कोळ सांगवी गावातील पुराच्या पाण्यात वाहून जात असताना बचावलेल्या वयोवृद्ध भगवान घुले यांची घरी जाऊन भेट घेतली संवाद साधत
त्यांना धीर दिला.यावेळी
माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड, अजय रक्ताटे,डॉ मुंत्यजय गर्जे ,जिल्हा परीषद सदस्य राहुल राजळे,अनिल बोरुडे , बंडूशेठ बोरूडे,प्रतिक खेडकर, मंगलताई कोकाटे, पांडूरंग सोनटक्के,सभापती गोकुळ दौंड,स्वप्नील काकडे,पावन मुखेकर,सरपंच विष्णू देशमुख,उपसरपं युवराज फुंदे, वृदेश्वर संचालक नारायण काकडे,संचालक बाबासाहेब किलबि,भगवान घोगरे,दामू आणा काकडे,अशोक गोरे, बाळासाहेब देशमुख,प्रांत देवदत्त केकाण,तहसीलदार शाम वाडकर,तालुका कृषी अधिकारी शिदे,सह सर्व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.
Tags :

