कल्पजीत डोईफोडे यांना आदर्श प्राचार्य पुरस्कार प्रदान
पाथर्डी - प्रतिनिधी
चाणक्य चारिटी ट्रस्ट, पुणे, संचलित आदर्श माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य कल्पजीत रामहरी डोईफोडे यांना ज्ञानोदय बहुउद्देशीय संस्था टाकळीभान यांच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय आदर्श प्राचार्य पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला आहे. याप्रसंगी आमदार लहु कानडे,आ.डॉ.सुधीर तांबे,कुलगुरू डॉ.पंडीत विद्यासागर,डॉ.वंदना मुरकुटे,डॉ.ज्ञानेशानंद महाराज,डॉ. बाबुराव उपाध्ये,मा.प्रकाश केदारी, श्रीमती साईलता सामलिटी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. कल्पजीत डोईफोडे हे मोहरी गावचे विद्यमान सरपंच असून आदर्श माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य म्हणून गेल्या दहा वर्षापासून ते काम पाहतात, त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी ते सतत प्रयत्नशील असतात. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी ते सोडवितात. विद्यालयात विविध प्रकारचे उपक्रम ते राबवत असतात तसेच समाजात सतत वेगळे करण्याची त्यांची कायम धडपड असते. करोना काळात अनेक गरजूंना त्यांनी स्वतःमदत,धान्य वाटप, किराणा वाटप आणि ग्रहउपयोगी वस्तू वाटप केलेले आहे. तसेच मोहरी गावात व पाथर्डी शहरात विविध सामाजिक क्षेत्रात काम करत असताना त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केलीली आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन ज्ञानोदय बहुउद्देशीय संस्थेने त्यांना आदर्श प्राचार्य पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल संस्थेचे अध्यक्ष गिरीश आव्हाड,उषाताई आव्हाड, दातीर साहेब,भास्कर आव्हाड व संस्थेचे सर्व पदाधिकारी शाळेचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ आणि मोहरी गावचे सर्व ग्रामस्थ व इतर सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.