मी जनतेची चिंता करते कोणते काम कोण करते हे जनतेला माहीत असते.
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यात झालेल्या जलसंधारणाच्या कामामुळे दुष्काळाची ओळख आता पुसली जात आहे. पुराचे संकट हे नैसर्गिक आहे. प्रशासकीय सेवेत येथील युवक यश मिळवून आता बुद्धिवंताचा तालुका व पावसाचा तालुका म्हणुन पाथर्डीची नवी ओळख होते आहे. मला पुढाऱ्यांची चिंता कधीत नव्हती. मी जनतेची चिंता करते. कोणते काम कोण करते, हे जनतेला माहिती असते. सरकारी कार्यालयात जाऊन माहिती घेतली आणि ती छापून आणली म्हणजे ते काम त्यांनी केले असे होत नाही, अशी टीका आमदार मोनिका राजळे यांनी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे यांचे नाव न घेता केली. पंचायत समितीच्या उपसभापती मनिषा वायकर यांच्या पंधरा व्या वित्त आयोग अंतर्गत विविध विकास कामांचे भूमिपूजन राजळे यांच्या हस्ते झाले. यावेळी राजळे बोलत होत्या. याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्या संध्या आठरे, पंचायत समितीच्या सभापती सुनिता दौंड, उपसभापती मनिषा वायकर, राहुल राजळे, माणिक खेडकर, सोमाथ खेडकर, एकनाथ आटकर, संजय मरकड, आर.बी.शेख, नारायण जाधव आदी उपस्थित होते.