पाथर्डी येथील वुमन क्रिकेट लीग स्पर्धेत एस. व्हि. नेट विजेता
पाथर्डी- प्रतिनिधी
पाथर्डी शहरातील एम. एम. निऱ्हाळी उच्च माध्यमिक विद्यालयाच्या मैदानात झालेल्या वूमन क्रिकेट लिग स्पर्धेमध्ये पाथर्डी येथील एस. व्हि. नेटने विजेतेपद पटकाविले तर उपविजेते पद पुणे येथील शिरसाट स्पोर्ट्सला मिळाले.
अहमदनगर जिल्ह्यातील महिलांसाठी पहिलीच ही स्पर्धा लेदर बॉल वर होती. एस.व्ही.नेट पाथर्डी व शिरसाट स्पोर्टस पुणे या संघात ५ वन डे मॅच सिरीजचे आयोजन पाथर्डी तालुका टी-२० क्रिकेट असोसिएशन व प्रतापकाका ढाकणे मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले होते.
या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे ही स्पर्धा महिला खेळाडूंना फी न घेता मोफत कलर ड्रेस, व्हाइट लेदर बॉल देऊन खेळवण्यात आली आहे. या स्पर्धेचे प्रायोजक बाळासाहेब गोल्हार,राजेंद्र खेडकर,आनंद सानप,अमोल शिरसाठ ,ओंकार राठोड,मंगेश भागवत यांनी मोलाचे सहकार्य केले.
बक्षीस वितरणासाठी प्रमुख पाहुणे हुमायुन आतार,आनंद सानप, अशोकराव दहिफळे, आरती नि-हाळी,दीपाली अग्रवाल,सौ.पन्हाळे ,शशिकांत नि-हाळी ,गणेश सरोदे यांच्या उपस्थितीत पार पडला.
या स्पर्धेचे विजेतेपद एस.व्ही.नेट पाथर्डी संघाने पटकावले तर उपविजेते पद शिरसाट स्पोर्ट्स,पुणे या संघाला मिळाले.वुमन ऑफ द सिरीज किताब आरती केदार हिने २०६ धावा व ६ व्हीकेट घेत मिळविला. उत्कृष्ट फलंदाज-श्रावणी देसाई, उत्कृष्ट गोलंदाज-ज्ञानेश्वरी वाघ, उत्कृष्ठ यष्टीरक्षक-श्रावणी सरोदे, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक-प्रज्ञा वीरकर यांना हा किताब मिळाला.
या बक्षीस वितरण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश सरोदे यांनी केले तर आभार आतिष नि-हाळी यांनी मानले.