राज्यपालाच्या हस्ते 'या' तालुक्याच्या आमदाराचा सत्कार
नगर सिटीझन live टीम प्रतिनिधी
पारनेर : कोरोना महामारीच्या काळात अविश्रांत परिश्रम घेऊन दोन्ही लाटांमध्ये तब्बल ३० हजारांवर रूग्णांना बरे करून घरी सोडणाऱ्या आमदार नीलेश लंके यांचे ख्याती सर्वत्र पसरली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही त्यांच्या या कामाचा नेहमीच गौरव केला जातो. कोरोनाची सर्वत्र भिती बाळगली जात असताना लंके यांनी थेट रूग्णांमध्ये जाऊन त्यांना धीर दिला. त्यामुळे त्यांच्या नावाभोवती जगभरात वेगळेच वलय निर्माण झालेले आहे. त्याचीच दखल घेत दिपाली सय्यद चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने शुक्रवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते लंके यांना महाराष्ट्र कोरोना योध्दा पुररस्कार देउन सन्मान करण्यात आला.