सर्वांत मोठी कारवाई! 20 लाखाची लाच घेताना सहाय्यक नगर रचनाकार गणेश माने जाळ्यात
By Admin
सर्वांत मोठी कारवाई! 20 लाखाची लाच घेताना सहाय्यक नगर रचनाकार गणेश माने जाळ्यात
- प्रतिनिधी - Nagar citizen
अवसायनातील संस्थेच्या जमिनीचे शासकीय मूल्यांकन करून देण्यासाठी 45 लाखाची मागणी करून 20 लाखाचा पहिला हप्ता स्वीकारताना मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमधील कोल्हापूर मुद्रांक जिल्हाधिकारी सहजिल्हा निबंधक कार्यालयातील सहाय्यक रचनाकार गणेश हनमंत माने (वर्ग 2 अधिकारी) यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले.
यातील तक्रारदार हे सुतगिरणीचे अध्यक्ष आहेत. ही संस्था शासनाने अवसायनात काढल्याने अवसायक यांनी सुतगिरणीची नोंदणी रद्द करण्याची असल्याने त्याकरिता संस्थेच्या जमिनीचे शासकीय मूल्यांकन करून दाखला देण्यासाठी मुद्रांक जिल्हाधिकारी यांना पत्र दिले होते.
मालमत्तेचे मूल्यांकन लवकर करून दाखला मिळावा म्हणून तक्रारदार सहाय्यक रचनाकार गणेश माने यांना वेळोवेळी भेटले होते.
21 जानेवारी 2021 रोजी मालमत्तेचे मूल्यांकन करून लवकरात लवकर दाखल देण्याची तक्रारदारने विनंती केली असता माने यांनी मूल्यांकन करून दाखला द्यायचा असेल तर 45 लाख रूपये द्यावे लागतील असे सांगितले. तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांच्याकडे तक्रार अर्ज दिला. 21 जानेवारी व 1 फेब्रुवारी रोजी मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमधील माने याच्या लाच मागणीची पडताळणी पंच साक्षीदारांच्या समक्ष करण्यात आली.
पडताळणीमध्ये मालमत्तेचे शासकीय मूल्यांकन करून दाखला देण्यासाठी 45 लाख रूपये लाचेची मागणी माने याने करून पहिला हप्ता 20 लाख रूपये घेऊन येण्यास सांगून राहिलेले 25 लाख रूपये दाखला देताना घेऊन येण्यास सांगितल्याचे निष्पन्न झाले.
आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मध्यवर्ती प्रशासकीय इमारती मधील मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयात सापळा लावला असता तक्रारदार व गणेश माने हे दोघेजण कार्यालयातून बाहेर पडून आवारातील चहाच्या टपरीवर गेले व त्या ठिकाणी तक्रारदाराकडून 20 लाख रूपये लाच स्वीकारताना पथकाने पकडले.
ही कारवाई पोलीस उपायुक्त राजेश बनसोडे, अप्पर पोलीस अधीक्षक सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनानुसार पेालीस उपअधीक्षक अदिनाथ बुधवंत, पोलीस निरीक्षक युवराज सरनोबत, सहाय्यक फौजदार संजू बंबर्गेकर, पोलीस हवालदार शरद पोरे, पोलीस नाईक नवनाथ कदम, सुनील घोसाळकर, मयुर देसाई, चालक सुरज अपराध यांच्या पथकाने केली.