शाळा सुरू करण्यास मुख्यमंत्र्यांचा हिरवा कंदील या तारखेला होणार शाळा सुरू
४ ऑक्टोबरपासून होणार शाळा सुरू
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील शाळा सुरु करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली असल्याने आता ४ ऑक्टोबरपासून कोरोना नियमांचं पालन करुन शाळा सुरु होतील . कोरोनाची स्थिती सामान्य झाल्यानं राज्य सरकारनं हा निर्णय घेतला आहे . शालेय शिक्षण विभागाच्या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली आहे . राज्यातील शाळा सुरु करण्यासंदर्भात ऑगस्ट महिन्यात एकदा प्रयत्न
करण्यात आला होता . मात्र , त्यावेळी तो निर्णय स्थगित करण्यात आला होता . मुख्यमंत्री यांनी कोरोनाचे नियमांचं पालन करुन शाळा सुरु करण्यास मंजुरी दिली आहे . गेल्या वर्षीपासून शाळा बंद होत्या . कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाल्यानं शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे . बहुतांश ठिकाणी शिक्षक आणि शालेय कर्मचारी यांचं लसीकरण झालेलं आहे . त्यामुळे शाळा सुरु करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे.