पाथर्डी- 'ती' क्लिप झाली व्हायरल,वरीष्ठाकडे अहवाल पाठवणार
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
पाथर्डी : पोलिस ठाण्यातील कार्यरत असलेल्या दोन पोलिस कर्मचारी यांच्यातील परस्परांमधील संभाषणाची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. यात हप्ते वसुली करून पैसे आपण देतो, असा उल्लेख आहे. यामुळे पोलिसांची अब्रू चव्हाट्यावर आली आहे. ऑडिओ क्लिपच्या संभाषणाची चौकशी करून वरिष्ठांकडे अहवाल पाठवले जाणार असल्याचे पोलिस निरीक्षक सुहास चव्हाण यांनी सांगितले आहे.