महाराष्ट्र
167
10
अॕट्राॅसिटी’चं अनुदान अनेक वर्षांपासून प्रलंबित
By Admin
अॕट्राॅसिटी’चं अनुदान अनेक वर्षांपासून प्रलंबित
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
‘समाजकल्याण’चे अधिकारी बनताहेत ‘झारीतले शुक्राचार्य
नगर जिल्ह्यातल्या मागासवर्गीय समाज बांधवांवर होत असलेले प्राणघातक हल्ले, सवर्णांकडून केली जाणारी जातीवाचक शिवीगाळ यासाठी पिडित व्यक्तींना राज्य सरकार ठराविक अनुदान देत असते. मात्र हे अनुदान संबंधितांना गेल्या कित्येक वर्षांपासून मिळालेलेच नाही. यासाठी जबाबदार असलेले समाजकल्याण विभागाचे अधिकारीच ‘झारीतले शुक्राचार्य’ होत आहेत, ही वस्तुस्थिती पहायला मिळत आहे. परंतू या वस्तुनिष्ठ आणि गंभीर प्रश्नावर कोण आवाज उठविणार, हा खरा प्रश्न आहे.
एखाद्या मागासवर्गीय व्यक्तीला सवर्णांकडून जातीवाचक शिवीगाळ झाली किंवा त्या व्यक्तीवर जीवघेणा हल्ला झाला आणि त्या हल्ल्यात संबंधित व्यक्ती मरण पावली अथवा जखमी झाली तर त्या व्यक्तीला राज्यशासनाकडून ठराविक असे अनुदान देण्यात येते. यासाठी राज्यशासनाकडून वेगवेगळे टप्पे करण्यात आले आहेत. त्या टप्प्यांनुसार संबंधित व्यक्तीला अनुदान देण्यात येते.
यासाठीची जी काही जबाबदारी आहे, ती समाजकल्याण विभागावर सोपविण्यात येते. राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यांतल्या समाजकल्याण कार्यालयांमधून पिडित आणि अन्यायग्रस्त व्यक्तीला पन्नास हजारांपासून एक लाख किंबहूना त्याहीपेक्षा जास्त रक्कम अनुदान स्वरुपात देण्यात येते.
अनेक वर्षांपासून हे अनुदान प्रलंबित आहे. अनुदान मिळविण्यासाठी संबंधित पिडित आणि अन्यायग्रस्त व्यक्तीला समाजकल्याण विभागाच्या कार्यालयात वारंवार चकरा माराव्या लागताहेत. राज्य सरकारचा संबंधित अन्यायग्रस्त व्यक्तीला अनुदान देण्याचा मोठा उदात्त हेतू असतो.
राज्य सरकारच्या नियंत्रणाखाली असलेल्या समाजकल्याण विभागाच्या काही बेजबाबदार अधिकार्यांमुळे हे अॅट्राॅसिटीच्या या अनुदानासाठी संबंधितांना आणखी किती दिवस समाजकल्याण विभागाच्या कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागणार आहेत, असा प्रश्न अन्यायग्रस्त व्यक्तींमधून उपस्थित केला जातो आहे.
Tags :

