राष्ट्रीय महामार्ग रस्त्याची दुरावस्था, प्रशासनाचे दुर्लक्ष
भाजप युवा जिल्हा उपाध्यक्ष अमोल गर्जे यांनी खड्डा बुजवला
पाथर्डी- प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील माळीबाभुळगाव शिवारातील शिक्षक कॉलनी जवळील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ वर पडलेला मोठा खड्डा हा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष अमोल गर्जे यांनी स्वखर्चाने मुरूम टाकून बुजविला. त्यामुळे या ठिकाणाहून जाणारी वाहतूक पुन्हा सुरळीत झाली आहे.
या महामार्गाच्या रस्त्यावरील खड्डयाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याने तसेच नियोजन नसल्यामुळे या कामांमध्ये ठिकठिकाणी खड्डे पडले असून काम अपूर्ण आहे, या अपूर्ण कामामुळे तसेच खड्डे पडल्याने अनेकांचे अपघात होऊन हाल होत आहे. काहींचे प्राण या अपघाताने गेले, तर काहींना गंभीर दुखापती झाल्या आहेत.
अशा परिस्थितीत ठेकेदार व शासकीय अधिकारी याकडे गांभीर्याने लक्ष देत नाहीत, त्यामुळे शिक्षक कॉलनी जवळ या महामार्गावर पडलेला मोठा खड्डा अमोल गर्जे यांनी बुजवून प्रवाशांना दिलासा दिला आहे. या ठिकाणांहून आता वाहतूक सुरळीत झाली आहे.
प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे महामार्ग क्रमांक ६१ रस्त्याची दुरवस्था झाली आहे. प्रशासनाने व ठेकेदार यांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे.