बिबट्याच्या हल्ल्यात जखमी चिमुरडीने घेतला अखेरचा श्वास!!
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
बिबट्याच्या हल्ल्यातून वाचलेल्या एक दीड वर्षीय चिमुरडीचा उपचार सुरू असताना अखेर मृत्यू झाला !
मंगळवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास बिबट्याच्या हल्ल्याची घटना घडली होती .
बिबट्याच्या हल्ल्यात गंभीररित्या जखमी झालेल्या या बालिकेवर अकोले येथील एका खासगी रुग्णालयात उपचार होते सुधारणा होत नसल्याने तिला लोणी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते तरीही तिची प्रकृती चिंता जनक होती. माई जनक वैद्य असे या चिमुरडीचे नाव आहे . सुगाव खुर्द येथील सुखदेव भिकाजी वैद्य यांची नात माई सायंकाळी ७ च्या सुमारास घराच्या ओट्यावर खेळत होती. बाजूच्या उसातून अचानक आलेल्या एका बिबट्याने
या चिमुरडीवर झडप टाकून तिला जबड्यात पकडुन घेऊन जात होता हे दृश्य पाहून तेथे असलेल्या तिच्या आजी मीराबाई व बहिणींनी आरडाओरडा सुरू केला त्यावेळी . चिमुरडीचे आजोबा व घरातील लोक बिबट्याच्या मागे आरडाओरडा करत पळाले. त्यामुळे बिबट्याने मुलीला तेथेच टाकून बाजूच्या उसात पळ काढला.जखमी झालेल्या चिमुरड्या माईला . तातडीने अकोले येथील रुग्णालयात नेले तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर तिला येथील दुसऱ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिच्या गळ्या भोवती बिबट्याच्या दातामुळे गंभीर जखमा झालेल्या होत्या घटनेची गांभीर्य लक्षात घेऊन वन परिक्षेत्र अधिकारी प्रदीप कदम व त्यांचे सहकारी तातडीने रुग्णालयात आले. त्यांनी वैद्यकीय अधिकारी व जखमी मुलीच्य कुटुंबीयांशी चर्चा केली व वनविभागाचे वतीने सर्व खर्च केला जाईल असे सांगितले. आमदार डॉ किरण लहामटे यांनी या कुटुंबाची भेट देऊन मदत देण्याचें आश्वासन दिले
मृत्यूशी झुंजणाऱ्या चिमुरड्या माईने आज अखेरचा श्वास घेतला.