श्री तिलोक जैन विद्यालयात आनंद जलकुंभ भूमिपूजन सोहळा
पाथर्डी - प्रतिनिधी
पाथर्डी शहरातील श्री तिलोक जैन विद्यालयात चंपालाल गांधी व गांधी परिवाराच्या वतीने आनंद जलकुंभ उभारण्यासाठी देणगी देऊन नुकताच त्या कामाचा शुभारंभ करण्यात आला.
श्री तिलोक जैन विद्यालयात मागील वर्षी ज्येष्ठ गांधीवादी कार्यकर्ते व संस्थेचे उपाध्यक्ष चंपालाल गांधी यांनी त्यांच्या ८१ व्या वाढदिवसाच्या (सहस्रचंद्रदर्शन ) निमित्ताने संस्थेतील सर्व विद्यार्थ्यांना पिण्यासाठी स्वच्छ पाण्याची व्यवस्था व्हावी, ही इच्छा प्रदर्शित करून त्यासाठी जलकुंभ उभारणीकरिता देणगी देण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्या अनुषंगाने नुकतीच स्व. देशभक्त चंदनमल गांधी व कुंदनमल गांधी यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ चंपालालजी गांधी व गांधी परिवाराच्या वतीने मोठी देणगी देऊन या कामाची सुरुवात करण्यात आली.
या प्रसंगी आनंद जलकुंभाचा भूमिपूजन सोहळा राजेंद्र चंपालाल गांधी यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
या प्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष चंपालाल गांधी , सचिव सतीश गुगळे , खजिनदार सुरेश कुचेरिया ,विश्वस्त डॉ. ललित गुगळे ,राजेंद्र मुथ्या , कार्यकारी मंडळाचे सदस्य घेवरचंद भंडारी , संपतलाल गांधी , डॉ .सचिन गांधी , डॉ .अभय भंडारी , विजयकुमार लुणावत ,सल्लागार मंडळाचे सदस्य विश्वजीत गुगळे , प्राचार्य अशोक दौंड व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.