पाथर्डी तालुक्यातील 'या' गावात १ लाख ६५ हजाराची चोरी
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
पाथर्डी : चिंचपुर इजदे येथील छाया पोपट खेडकर यांच्या बंद घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करुन तीन तोळे सोन्याचे दागिने व रोख नव्वद हजार रुपये असा १ लाख ६५ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी १३ आक्टोंबर रोजी दुपारी चोरुन नेला आहे. खेडकर यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक रामेश्वर कांयदे तपास करीत आहेत.