महाराष्ट्र
पाथर्डी- "तुळजाभवानी भवानी मातेच्या पालखीचे पाथर्डी नगरीत भव्य स्वागत, व सवाद्य मिरवणूक"
By Admin
पाथर्डी- "तुळजाभवानी भवानी मातेच्या पालखीचे पाथर्डी नगरीत भव्य स्वागत, व सवाद्य मिरवणूक"
पाथर्डी - प्रतिनिधी
छत्रपती शिवाजीराजे भोसले व संपूर्ण महाराष्ट्राची कुलस्वामिनी असलेल्या व साडेतीन शक्तिपीठाचे स्थान असलेल्या तुळजापूरच्या आई तुळजाभवानी मातेच्या वर्षभर व खास नवरात्रीसाठी असलेल्या शेकडो वर्षाच्या प्रथा - परंपरा व रीतीरिवाज आजही मोठ्या श्रद्धेने विधीपूर्वक मानकऱ्यामार्फत व भक्तगणा कडून पार पाडल्या जातात. त्यातीलच परंपरेचा नगर जिल्ह्याशी अतिशय जवळचा व श्रद्धेचा संबंध आहे.
आई तुळजाभवानी देवीच्या श्रमनिद्रा, घोरनिद्रा, व योगनिद्रा यासाठीचा तुळजाभवानीचा मनाचा पलंग घेऊन जाण्याचा मान अहमदनगर येथील तेली समाजाच्या 'पलंगे' घराण्याचा आहे. तसेच आई तुळजा भवानीच्या सीमोल्लंघनासाठी ज्या पालखीत बसवून सीमोल्लंघन केले जाते, ती पालखी आणण्याचा मान अहमदनगर शहरालगतच्या बुऱ्हानगर गावातील 'भगत' घराण्याकडे आहे. घटस्थापनेच्या तिसऱ्या दिवशी भिंगार येथे पलंग व पालखी चा अभूतपूर्व भेटीचा सोहळा संपन्न होतो व त्यानंतर पालखी व पलंग तुळजापूरकडे रवाना होतात.
आई तुळजाभवानी ची ती मनाची पालखी आज मार्गक्रमण करीत पाथर्डी नगरीत दाखल झाली. पाथर्डी येथील 'सुवर्णयुग' मंडळाच्या गणपती मंदिराच्या प्रांगणात आल्यानंतर तेथे पालखीची आमदार मोनिकाताई राजीव राजळे, तसेच ह. भ.प. मोहन महाराज सुडके, ह.भ. प. राम महाराज झिजूर्के,व माधवबाबा यांच्या हस्ते पालखीची वेदशास्त्रसंपन्न सचिन देवा यांच्या,मंत्रोपचाराने विधिवत पूजा संपन्न झाली. त्यानंतर पालखीची सवाद्य मिरवणूक, नवी पेठ ,मेन रोड,येथून कसबा पेठ ब्राह्मण गल्ली, येथे खंडोबा भक्त व धार्मिक कार्यात सतत अग्रेसर असणारे श्री अशोकराव साठे यांच्या घरी पालखीचे आगमन झाले. तेथे पूजा,आरती व प्रसाद होऊन पालखी पुढे मार्गक्रमण झाली. यावेळी नगराध्यक्ष डॉ, मृत्युंजय गर्जे, उपनगराध्यक्ष नंदकुमार शेळके, नगरसेवक बजरंग घोडके, मंगलताई कोकाटे, अनिल बोरुडे, वृद्धेश्वर चे संचालक बाळासाहेब गोल्हार तसेच अनेक पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी महिलांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती.
या आई तुळजाभवानी मातेच्या मनाच्या पालखी आगमनाच्या सोहळ्याने पाथर्डी येथील वातावरण भक्तीमय होऊन गेले. या पालखी सोहळ्यासाठी श्री अशोकराव साठे, अनिल साठे, श्री परीमल बाबर व मित्र मंडळ, श्री रमण लाहोटी व मित्र मंडळ, श्री प्रशांत शेळके व मित्र मंडळ ,साईनाथ नगर मित्र मंडळ, कसबा नवोदय मित्रमंडळ यांनी परिश्रम घेतले.
Tags :
18377
10