सुवर्णकमळ मल्टीपल निधी लिमिटेड बँकेला आयएसओ मानांकन प्राप्त
पाथर्डी प्रतिनिधी:
पाथर्डी तालुक्यातील सुसरे येथील सुवर्णकमळ मल्टीपल निधी लिमिटेड या निधी बँकेला नुकतेच अमेरिकन संस्थेकडून आयएसओ मानांकन प्राप्त झाले आहे.
सुवर्ण कमळ या निधी बँक मध्ये ग्राहकांना सर्व सोयी सुविधा पुरविल्या जातात. यामध्ये गोल्ड लोन, महिला बचत गट कर्ज, पगार तारण कर्ज, मालमत्ता तारण कर्ज, व्यवसायिक कर्ज, ग्राहकांना ठेवीवर १२% व्याजदर, आरडी वर सर्वाधिक व्याजदर, कन्यादान ठेव योजना अशा अनेक सुविधा सुवर्णकमळ मार्फत पुरविल्या जातात. त्याचबरोबर सामाजिक कार्यात संस्था नेहमी अग्रेसर आहे. त्यामुळे संपूर्ण ग्राहक वर्ग आनंदी आहे.
अशा प्रकारे चांगल्या सेवा, सुविधा आणि गुणवत्ता म्हणून दिले जाणारे कॉलिटी मॅनेजमेंट सिस्टीम आय एस ओ ९००१:२०१५ हे मानांकन संस्थेस युके (अमेरिकन) संस्थेकडून दिल्ली द्वारा प्राप्त झाले आहे.
त्याचा स्वीकार सद्गुरु जोग महाराज संस्थान केंद्र आखेगाव येथील ह-भ-प श्री राम महाराज झिंझुर्के यांच्या हस्ते स्वीकारताना संस्थेचे संस्थापक /अध्यक्ष श्रीधर कंठाळी, दादा पाटील कंठाळी, दत्तात्रय उदागे, संस्थेचे संचालक सुभाष भवार, राम राऊत, मोहन बन, विजय घाडगे, श्रीकांत मिसाळ, गणेश, गणेश उदागे, रामकिसन कंठाळी व सुवर्णकमळ मित्र परिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते.