पाथर्डी तालुक्यातील एसटी बस चालकाने एसटीबसमध्येच केली आत्महत्या , धक्कादायक घटना
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
संगमनेर बस स्थानकात एसटी बसमध्येच चालकाने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना संगमनेर एसटी आगरामध्ये आज सकाळी उघडकीस आली. सुभाष शिवलिंग तेलोरे (रा. कोल्हार, ता. पाथर्डी) असे आत्महत्या केलेल्या चालकाचे नाव आहे.
पाथर्डी एसटी आगारातून (एमएच १४ बीटी ४८८७) ही बस घेऊन चालक तेलोरे संगमनेर बस स्थानकात आले. स्वतःच्या ताब्यातील एसटीचे डिझेल संपले होते. त्यामुळे संगमनेर बसस्थानकात एसटी उभी केली होती. त्यानंतर त्यांनी बसमध्येच गळफास घेवून आत्महत्या केली. एसटी बस चालकाने आत्महत्या केल्याने महामंडळातील कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. या घटनेचा तपास पोलिस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार शिवाजी फटांगरे हे करत आहे.