महाराष्ट्र
388
10
पाथर्डी श्रीक्षेत्र मोहटा देवी शारदीय नवरात्रोत्सव
By Admin
पाथर्डी श्रीक्षेत्र मोहटा देवी शारदीय नवरात्रोत्सव
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पाथर्डी तालुक्यातील श्रीक्षेत्र मोहटा देवी गडावर देवस्थान समिती व सरकारी विभागप्रमुखांची बैठक उपविभागीय अधिकारी देवदत्त केकाण यांच्या अध्यक्षतेखाली आज (सोमवार) उत्साहात झाली.
या वेळी तहसीलदार श्याम वाडकर, गटविकास अधिकारी जगदीश पालवे, पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण, धर्मदाय कार्यालयाचे एस. आर. मोरे, आरोग्य विस्तार अधिकारी डॉ. आर. जी. घुगे, वनपरिक्षेत्र अधिकारी अरुण साबळे, आगार व्यवस्थापक महेश कासार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ भगवान दराडे, सां. बा. उपविभागाचे मिसाळ, महावितरणचे एस. ई. अहिरे, विश्वस्त अशोक विक्रम दहिफळे, डॉ. ज्ञानेश्वर दराडे, आजिनाथ आव्हाड, भीमराव पालवे, अशोक भ. दहिफळे व मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भणगे उपस्थित होते.
नवरात्रोत्सव दि. 26 सप्टेंबर ते दि. 9 ऑक्टोबरदरम्यान संपन्न होत असल्याने या कालावधीत देवीच्या दर्शनासाठी लाखो भाविक येत असतात. यात्रा सुरळीत पार पडावी, म्हणून गर्दीचे नियोजन, दर्शन मार्ग, वाहतूक व सुरक्षा नियोजन यांची माहिती घेण्यात आली. नवरात्रोत्सवापूर्वी करावयाच्या कामांचे नियोजन देण्यात देऊन कामाची पूर्तता करून घेण्याचे संबंधित विभागांना आदेश देण्यात आले.
तहसीलदार वाडकर यांनी दक्षता व उपाययोजना संदर्भात सूचना दिल्या. पोलीस विभाग व देवस्थान प्रशासन समन्वय ठेवून वाढीव सुरक्षा व्यवस्था व चोख बंदोबस्त ठेवण्यात येईल, असे पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण यांनी यावेळी सांगितले. पाणीसाठे तपासणे, आरोग्य व स्वच्छता याबाबत नियोजन केले जाईल, असे गटविकास अधिकारी पालवे यांनी सांगितले. अतिक्रमणे, रस्त्यांच्या आवश्यक दुरुस्त्या, संरक्षक कठडे याबाबत तत्काळ उपाययोजना करण्याबाबत उपविभागीय अधिकारी केकाण यांनी आदेश दिले.
सरपंच एरिना पालवे यांनी महिलांच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित करून ग्रामपंचायतीमार्फत पथदिवे, स्वच्छता, तसेच पार्किंग व्यवस्थेबाबत महसूल विभागाशी समन्वय ठेवून निर्णय घेतला जाईल, अशी माहिती दिली. राज्य परिवहन महामंडळामार्फत वाढती गर्दी लक्षात घेता 100 बसेसचे नियोजन करण्यात आल्याचे आगार व्यवस्थापक महेश कासार यांनी सांगितले.
देवस्थानमार्फत अहोरात्र माहिती व सुविधा केंद्र सुरू ठेवणे, ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे गर्दीचे व वाहनांचे नियोजन करणे, एलईडी स्क्रिन लावून दर्शन व्यवस्था करणे, स्वच्छता व स्वच्छतागृहाची संख्या वाढविणे, वॉकी-टॉकी यंत्रणा ठेवणे, आदी सूचना यावेळी दिल्या. सुरेश भणगे स्वागत केले.
Tags :
![](https://nagarcitizenlive.com/assets1/img/core-img/like.png)
![](https://nagarcitizenlive.com/assets1/img/core-img/chat.png)