महाराष्ट्र
भाजपा शहराध्यक्ष भागीरथ बियाणींची गोळ्या झाडून आत्महत्या
By Admin
भाजपा शहराध्यक्ष भागीरथ बियाणींची गोळ्या झाडून आत्महत्या
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
आज बीड शहर पुन्हा एकदा हादरून गेले आहे. बीडमध्ये एक धक्कादायक घटना उघड झाली आहे. बीड भाजपा शहराध्यक्ष भागीरथ बियाणी यांनी गोळी झाडून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.
या घटनेमुळे परिसरात एकच गोंधळ झाला आहे. दरम्यान बियाणी यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
भगीरथ बियाणी हे बीड शहरातील एमआयडीसी परिसरात राहत होते. मिळालेल्या माहितीनुसार, भगीरथ बियाणींनी आज सकाळच्या सुमारास गोळी झाडत आत्महत्या केली. त्यानंतर तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी भगीरथ बियाणींना मृत घोषित केले.
दरम्यान, भगीरथ बियाणींनी आत्महत्या का केली? याबद्दल अद्यापही संभ्रम आहे. पोलिसांनी याप्रकरणाचा तपास सुरु केला आहे. घटनेची माहिती मिळताच खासदार प्रीतम मुंडे घटनास्थळी दाखल झाल्याचे सांगण्यात येत आहे.
भाजपचे शहराध्यक्ष भगीरथ बियाणी यांनी आज सकाळी स्वतःवर गोळी झाडून घेतली. या घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर त्यांना तत्काळ शहरातील फिनिक्स रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र रुग्णालयात डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांना ही माहिती कळताच त्या तत्काळ रुग्णालयात पोहोचल्या.
भगीरथ बियानी यांनी बीडपासून सुमारे 25 किमी लांब असलेल्या त्यांच्या एमआयडीसी परिसरातील घरामध्ये आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. त्यांच्या घरी पिस्तुल सापडलं असून त्यामधून गोळी झाडल्याचं स्पष्ट आहे अशी माहिती बीडचे पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकुर यांनी दिली आहे.
भगीरथ बियाणी यांच्या कुटुंबातील सदस्यांना याची सर्वप्रथम माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी बियानी यांना रुग्णालयात दाखल केलं. पण त्यापूर्वीच त्यांचं निधन झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.
बियानी यांच्या आत्महत्येमागचं नेमकं कारण काय हे अद्याप समोर आलं नाही. बियानी यांच्या आत्महत्येमुळे त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना मोठा धक्का बसला असून ते कोणतीही प्रतिक्रिया देण्याच्या मानसिकतेमध्ये नाहीत. त्यामुळे बियानी यांच्या आत्महत्येच्या कारणाचा अंदाज आताच व्यक्त करता येणार नसल्याचं पोलिसांच्या वतीनं सांगण्यात येतंय.
भगीरथ बियाणी हे भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांचे निकटवर्ती होते. गेल्या अनेक वर्षापासून ते भाजपमध्ये सक्रिय कार्यकर्ते म्हणून काम करायचे. सध्या त्यांच्याकडे बीडच्या भाजपच्या शहराध्यक्ष पदाची जबाबदारी होती. राजकारणाबरोबरच सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात भागीरथ बियाणी यांच योगदान मोठं होतं.
आज सकाळी पहाटेच्या सुमारास बियाणी हे आपल्या एका सहकाऱ्यासोबत मुंबईला चालले होते. मात्र काही अंतरावर गेल्यानंतरच ते बीडमध्ये परत आले आणि घरी आल्यानंतर सकाळी उशिरापर्यंत त्यांच्या रूमचा दरवाजा उघडला नाही. त्यामुळे कुटुंबीयांना चिंता वाटली आणि दरवाजा तोडून कुटुंबीयांनी आत प्रवेश केला. यावेळी भगीरथ बियानी रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे आढळून
आलं.त्यानंतर त्यांना तात्काळ बीडच्या एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारा पूर्वी त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेची माहिती मिळताच बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांनी तात्काळ रुग्णालयात धाव घेतली होती.भगीरथ बियाणी हे भाजपचे निस्सिम कार्यकर्ते होते. ते शांत आणि मनमिळावू स्वभावाचे तसेच अभ्यासू नेतृत्व म्हणून सर्वत्र परिचित होते. दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत त्यांनी अनेक वर्षे काम केल. त्यांच्यानंतर माजी मंत्री पंकजा मुंडे आणि खासदार प्रितम मुंडे यांचे अतिविश्वासू कार्यकर्ते असल्यानं त्यांच्यावर बीडच्या भाजप शहराध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली होती.भगीरथ बियाणी यांनी गोळी झाडून नेमकी आत्महत्या का केली याचा तपास आता पोलीस करत आहेत. मात्र त्यांच्या जाण्याने बीडच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात हळूहळू व्यक्त करण्यात येत आहे.
Tags :
6160
10