महाराष्ट्र
Breaking- येत्या चार दिवसात वाऱ्यासह अवकाळी पाऊसाची शक्यता 'या' जिल्ह्यांना हाय अलर्ट
By Admin
Breaking- येत्या चार दिवसात वाऱ्यासह अवकाळी पाऊसाची शक्यता 'या' जिल्ह्यांना हाय अलर्ट
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
पुढील पाच दिवस भारतीय हवामान खात्याने (IMD) महाराष्ट्र, गुजरात, पूर्व राजस्थान आणि पश्चिम मध्य प्रदेशासह विविध भागांत पावसाचा अंदाज (Rainfall alerts) वर्तवला आहे. तसेच उद्या 07 मार्च रोजी हवामान खात्यानुसार राज्यातील नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक आणि औरंगाबाद या पाच जिल्ह्यांना येलो अलर्ट (Yellow alert) जारी केला आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मेघगर्जना होणार आहेत. तर तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. याशिवाय उद्या पुण्यासह ठाणे, पालघर, अहमदनगर आणि जालना या पाच जिल्ह्यात ढगाळ हवामानाची शक्यता आहे.
पूर्वेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे देशात सध्या अनेक ठिकाणी पावसासाठी पोषक हवामान (Rainy Weather) निर्माण झालं आहे. उद्यापासून देशात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता (heavy rainfall) आहे.
08 आणि 09 मार्च रोजी राज्यात पावसाचा जोर अधिक वाढणार आहे. या दिवशी जवळपास सर्वच राज्यात पावसाची स्थिती राहणार आहे. मंगळवारी (8 मार्च) राज्यात पश्चिम महाराष्ट्रसह, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात बहुतांशी सर्वच ठिकाणी येलो अलर्ट जारी केला आहे. शेतकऱ्यांसह सामान्य नागरिकांसाठी पुढील पाच दिवस अत्यंत महत्त्वाचे ठरणार असून हवामान तज्ज्ञांनी सतर्कतेचा इशारा दिला आहे. पूर्वेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांचा प्रभाव महाराष्ट्रावर देखील जाणवणार आहे. उद्यापासून पुढील चार दिवस राज्यात जवळपास सर्वच ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. संबंधित ठिकाणी वेगवान वाऱ्यांसह विजांचा कडकडाट होणार आहे. दरम्यान तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस कोसळणार आहे. कोकणातही ढगाळ हवामान राहणार असून येथेही पावसाची स्थिती आहे. 10 मार्च रोजी राज्यात पावसाचा जोर काहीसा कमी होणार आहे. यादिवशी विदर्भातील अकरा जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे. त्याचबरोबर पुण्यासह सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, नाशिक, अहमदनगर, जळगाव आणि धुळे या आठ जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळणार आहेत.
Tags :
8495
10