पाथर्डी शहराला दूषित पाणीपुरवठा नागरिकांनी मुख्याधिकारी अनुपस्थित असल्याने त्यांच्या खुर्चीला घातला पुष्पहार
पाथर्डी- प्रतिनिधी
पाथर्डी : शहरात गेल्या काही दिवसांपासून अत्यंत खराब पाणीपुरवठा होत असुन पिवळसर व दुर्गंधीयुक्त दूषित पाणी जनतेला नाईलाजाने प्यावे लागल्याने त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.;दरम्यान मुकुंद गर्जे व त्यांच्या सहकाऱ्यांनी यांची दखल घेत.मुख्याधिकारी यांनाच दूषित पाणी पिण्यासाठी नगरपालिकेत गेले.त्यावेळी मुख्याधिकारी अनुपस्थित असल्याने आंदोलकांनी त्यांच्या खुर्चीला हार घालत त्यांचा निषेध नोंदवत.
पाथर्डी : शहरात गेल्या काही दिवसांपासून अत्यंत खराब पाणीपुरवठा होत असुन पिवळसर व दुर्गंधीयुक्त दूषित पाणी जनतेला नाईलाजाने प्यावे लागते.
येत्या २ दिवसात यामध्ये सुधारणा झाली नाही.तर आणखी तीव्र पध्दतीने आंदोलन केले जाईल अशा इशारा दिला.
यावेळी आंदोलनात ईजाज शेख ,आण्णा हरेर,सचिन नागपुरे, शहनावाज शेख,निलेश फुटाणे,ओंकार जोशी,तन्वीर आतर,समीर शेख,अभिजित इथापे,सुरेश हुलजुते,विकास दिनकर,शुभम पारखे,उजेर आतार,छोटू पठाण आदि जण सहभागी झाले होते.
शहरातील जनतेच्या आरोग्याशी निगडित असलेल्या खराब पाणी प्रश्नाकडे कुणाचेही लक्ष नाही. यासाठी १० मार्च रोजी सकाळी नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी साहेबांना पिवळसर पाणी प्यायला देणार असे आवाहन मुकुंद गर्जे यांनी समाज माध्यमातून केले होते.जवळपास १२ वाजले तरी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी कार्यालयात हजर होते.याबाबत सविस्तर माहिती विचारली असता पालिकेतील कर्मचारी अधिकारी यांनी मुख्याधिकारी साहेब येणार आहेत की नाही,रजेवर आहेत की नाही याबाबत माहिती नसल्याचे सांगितले.त्यानंतर आंदोलकांनी मुख्याधिकारी यांच्या खुर्चीला हार टोपी घालत निषेध नोंदवला. यावेळी पालिकेचे प्रतिनिधी म्हणून पाणीपुरवठा विभागाचे अशोक डोमकावळे
यांच्याकडे दूषित पाणीपुरवठ्याबाबत चौकशी केली असता त्यांनीमी पाणीपुरवठा विभागाचा तांत्रिक कर्मचारी नसून कारकुन माणूस आहे.याबाबत मुख्याधिकारी साहेब हेच सांगू शकतील.सदरील ठिकाणची पाहणी केली आहे.दोन तीन दिवस असेच पाणी राहील.४ मार्च रोजी जिल्ह्यापरिषदेला दुर्गंधीयुक्त व पिवळसर पाण्यामुळे पाथर्डीच्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते याबाबत माहिती दिली असल्याची माहिती दिली आहे.