महाराष्ट्र
पाथर्डी- ऊसतोड मुकादमास करंजी घाटात अडवून लुटणारी टोळी मुद्देमालासह जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
By Admin
पाथर्डी- ऊसतोड मुकादमास करंजी घाटात अडवून लुटणारी टोळी मुद्देमालासह जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
पाथर्डी तालुक्यातील 'या' गावातील तरुण जेरबंद
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
संत तुकाराम साखर कारखाना (मुळशी, जि. पुणे) येथुन ऊसतोड मुकादम हा मजुरीची रोख रक्कम दुचाकीवर घरी घेऊन जात होते. या दरम्यान रात्रीच्यावेळी करंजीघाटात वाहन आडवून मुकादमास मारहाण करुन जबरी चोरी करणारी टोळी पोलीसांनी पकडण्यात आली. टोळीकडून ५ लाख रु.रोख रक्कम व इतर मुद्देमाल जप्त करण्याची कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे.प्रविण ऊर्फ पप्पु दिलीप दराडे ( वय ३२, रा. पागोरी पिंपळगांव, ता. पाथर्डी), अंबादास नारायण नागरे (वय ३१, रा.पागोरी पिंपळगांव, ता. पाथर्डी) तात्याबा पोपट दहिफळे (वय ३३, रा. महिंदा, ता. आष्टी, जिल्हा बीड) दत्तु बाबादेव सातपुते (वय ३४, रा. निपाणी जळगांव,ता.पाथर्डी) असे पकडण्यात आलेल्याची नावे आहेत.प्रस्तुत बातमीतील माहिती अशी की, दि. २८ जून २०२२ रोजी फिर्यादी संतोष सहदेव बर्डे(रा.भिलवडे तालुका पाथर्डी) हे त्यांचा भाऊ भाऊ साक्षीदार बबन असे संत तुकाराम साखर कारखाना (मुळशी, जि. पुणे) येथून त्यांचे कामकाजाचे ५ लाख ७० हजार रु. रोख व अजिनाथ कारभारी मिसाळ यांचे कामकाजाचे २ लाख रु. रोख असे एकूण ७ लाख ७० हजार रु.रोख रक्कम दुचाकीवर घेऊन घरी येत असतांना करंजीघाट (ता. पाथर्डी) येथे
दर्ग्याजवळ,त्यांचे पाठीमागुन एक स्कॉर्पिओ गाडी येऊन दुचाकीला कट मारुन स्कॉर्पिओ आडवी लावून गाडीतील अज्ञात तीन जणांनी मारहाण करुन,धाक दाखवून दुचाकीच्या डिकीमध्ये ठेवलेली रोख रक्कम बळजबरीने चोरुन नेली आहे.
संतोष शहादेव बर्डे (वय ३६, धंदा ऊसतोड मुकादम व शेती, रा. भिलवडे, ता. पाथर्डी, जि.अहमदनगर) यांच्या फिर्यादीवरून पाथर्डी पोलीस ठाण्यात गु.र.नं. ६५३ / २२ भादविक ३९४, ३४ प्रमाणे जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.गुन्हा दाखल झाल्यानंतर नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.श्री.बी.जी.शेखर पाटील यांनी व जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी या घटनेचे गांभिर्य लक्षात घेऊन आरोपींचा तात्काळ शोध घेऊन गुन्हा उघडकिस आणण्याबाबत स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना सूचना दिल्या होत्या. सूचनेप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा पोनि श्री.कटके यांनी स्थागुशाचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे विशेष पथक नेमून गुन्ह्याचा समांतर तपासाबाबत सूचना दिल्या. त्याप्रमाणे पथकाने दुचाकी आडवून,मारहाण करुन जबरी चोरी करणा-या आरोपीतांची माहिती घेत असतांना पोनि/ श्री.अनिल कटके यांना गोपनिय माहिती मिळाली की, गुन्हा हा पप्पु दराडे याने केला आहे.तो आता पागोरी पिंपळगांव (ता.पाथर्डी) येथे त्याच्या राहत्या घरी आलेला आहे.आता गेल्यास मिळून येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाली. ही माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री.अनिल कटके यांनी पथकाला दिली. पथकाने पागोरी पिंपळगांव (ता.पाथर्डी) येथे जाऊन मिळालेल्या माहितीवरुन आरोपीचे घराजवळ सापळा लावून थांबलेले असतांना एक संशयीत येतांना दिसला. त्यास शिताफीने ताब्यात घेऊन त्यास नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव प्रविण ऊर्फ पप्पु दिलीप दराडे (वय ३२, रा. पागोरी पिंपळगांव, ता. पाथर्डी) असे असल्याचे सांगितले.त्याच्याकडे घडलेल्या गुन्हयाबाबत चौकशी केली असता तो सुरुवातीस उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला,त्यास अधिक विश्वासात घेऊन कसून चौकशी केली असता त्याने गुन्हा हा त्याचा साथीदार आंबादास नागरे, तात्याबा दहिफळे व दत्तु सातपुते असे सोबत मिळून केल्याची कबुली दिली.पथकाने आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन ताब्यात घेतले.ताब्यात घेतलेल्यांना त्याचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव आंबादास नारायण नागरे ( वय ३१, रा. पागोरी पिंपळगांव, ता. पाथर्डी) तात्याबा पोपट दहिफळे ( वय ३३, रा. महिंदा, ता. आष्टी, जि. बीड) दत्तु बाबादेव सातपुते (वय ३४, रा. निपाणी जळगांव, ता. पाथर्डी) असे सांगितले. त्याच्याकडे गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली देऊन गुन्ह्यात चोरीस गेलेली ५ लाख रु. रोख तसेच गुन्हा करण्यासाठी वापरलेली १२ लाखाची महिंद्र स्कॉर्पीओ व ४० हजार रु. किं.चे चार मोबाईल फोन असा एकुण १७ लाख ४० हजार रु. किंचा मुद्देमाल काढून दिल्या.तो जप्त करुन आरोपींना मुद्देमालासह पाथर्डी पोलिस ठाण्यात हजर करण्यात आले.गुन्ह्यातील सर्व आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर यातील मुख्य आरोपी प्रविण ऊर्फ पप्पु दिलीप दराडे यास पोलिस खाक्या दाखविताच,मी व माझे साथीदार असे दि.२७ जूनला संत तुकाराम साखर कारखाना, (मुळशी, जि. पुणे) येथे कारखान्याचा ऊस वाहतूक करार करण्यासाठी गेलो होतो.त्यावेळी फिर्यादी आजीनाथ मिसाळ यास संत तुकाराम साखर कारखाना ( मुळशी, जि.पुणे) येथून ऊसतोडीची रोख रक्कम घेतांना पाहिले होते.त्यानंतर मी माझे साथीदारासह त्याचा मुळशी पुणे येथून पाठलाग करुन करंजीघाट (ता. पाथर्डी) येथे स्कॉर्पिओ गाडी त्याचे दुचाकीला आडवी लावून,मारहाण करुन रोख रक्कम बळजबरीने चोरुन नेली होती. अशी कबुली दिली.आरोपी प्रविण ऊर्फ पप्पु दिलीप दराडे व अंबादास नारायण नागरे हे दोन्ही सराईत गुन्हेगार आहे. सदरची कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल व शेवगाव उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या सूचनेनुसार स्थागुशा पथकातील पोसई/सोपान गोरे,सफौ/मनोहर शेजवळ,पोहेकॉ/संदीप पवार,संदीप घोडके,देवेंद्र शेलार,पोना/संतोष लोढे,पोना/शंकर चौधरी,संदीप चव्हाण,दिपक शिंदे,विश्वास बेरड, पोकाॅ/योगेश सातपुते,सागर ससाणे व चापोहेकॉ/संभाजी कोतकर आदिंच्या पथकाने केली आहे.पुढील कारवाई पाथर्डी पोलिस करीत आहेत.
Tags :
489153
10