पाथर्डी शहरात पोलिसांचे सशस्त्र पथसंचलन
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
पाथर्डी -दिवाळी व इतर उत्सवाच्या पार्श्वभुमीवर शहरात शांतता रहावी यासाठी पोलीसदल, व १०२ बटालीयन मुंबई, रॅपिड ॲक्शन फोर्स, शीघ्र कृती दलाने शहरातील विविध भागातील प्रमुख मार्गावरून सशस्त्र पथसंचलन केले या पथसंचलनामध्ये पोलीस व कृती दलाचे ८ अधिकारी व ७५ जवानांनी सहभाग घेतला.
जिल्हा पोलीस अधीक्षक व वरिष्ठांच्या सुचनेनुसार व मार्गदर्शनाखाली केंद्र व राज्य सरकारच्या अखत्यारीत असलेले राज्य राखीव दलाच्या रॅपिड ऍक्शन फोर्स शीघ्र कृती दलाच्या जवान व पोलीस यांनी हे संचलन केले.दिवाळी व इतर सणांच्या पार्श्वभूमीवर शहरातील व तालुक्यातील कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी, सर्वसामान्य नागरिकांना भयमुक्त जीवन जगता यावे. सुरक्षितता वाटावी, आत्मविश्वास निर्माण व्हावा व समाज विघातक शक्तींना पायबंद बसावा व त्यांच्यामध्ये दहशत निर्माण व्हावी, आपत्कालीन परिस्थितीमध्ये शीघ्र कृती दलाच्या जवानांना शहरातील
मार्गाची व परिसराची माहिती व्हावी या उद्देशाने असे पथसंचलन नियमितपणे पोलीस व राखीव दलाच्या वतीने संयुक्तपणे राबविले जाते. यामध्ये पाथर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण, फोर्सचे सिंग साहेब, मीणा साहेब, पाथर्डी पोलीस स्टेशनचे सहाय्यक निरीक्षक व उपनिरीक्षक यांच्यासह आठ अधिकारी व जवान सहभागी झाले होते.