महाराष्ट्र
सहकारी बँकेत बनावट सोने तारण ठेवून दोन कोटींचे कर्ज उचलले
By Admin
सहकारी बँकेत बनावट सोने तारण ठेवून दोन कोटींचे कर्ज उचलले
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
अहमदनगर बेन्टेक्स वर हॉलमार्कचा बनावट शिक्का मारून शहर सहकारी बँकेत तारण ठेवून तब्बल दोन कोटी वीस लाख रुपयांचे कर्ज उचलण्याचा प्रकार समोर आला आहे.
अहमदनगर शहर सहकारी बँकेत बनावट सोने तारण ठेवून दोन कोटी वीस लाख रुपयांचे कर्ज उचलल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे . बँकेकडून नियुक्त करण्यात आलेल्या गोल्ड व्हॅलीवरने 5,900 ग्राम बनावट सोने कारण ठेवून 23 जणांना एकूण दोन कोटी वीस लाख रुपयांचे कर्ज वाटप केल्याचे समोर आले असून,हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे ,अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली.
याप्रकरणी अहमदनगर शहर सहकारी बँकेचे शाखाधिकारी मंदार सुरेश सुभेदार (Mandar Suresh Subhedar) यांनी कोथरुड पोलीस ठाण्यात (Kothrud Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. २१५/२२) दिली आहे. त्यानुसार अजित प्रभाकर कुलकर्णी (Ajit Prabhakar Kulkarni), मारुती शिवाजी सूर्यवंशी (Maruti Shivaji Suryavanshi), सुनिल रघुनाथ कदम (Sunil Raghunath Kadam), वैजयंती सुनिल कदम (Vaijayanti Sunil Kadam), केतन विलास अमराळे (Ketan Vilas Amarale), सनी देवीदास बलकावडे (Sunny Devidas Balkawde) यांच्यावर गुन्हा (FIR) दाखल केला आहे. हा प्रकार १० नोव्हेंबर २०२० ते १६ नोव्हेंबर २०२१ दरम्यान घडला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजित कुलकर्णी हे अहमदनगर शहर सहकारी बँकचे गोल्ड व्हॅल्युअर आहेत. त्यांनी बँकेच्या कर्जदारांशी संगनमत केले. इतर आरोपी यांच्याजवळ असलेले सोन्याचे दागिने हे खोटे असल्याचे त्यांना माहिती होते. तरीही त्यांनी ते खरे असल्याचे भासवून बँकेला हे दागिने खरे असल्याबाबत बनावट प्रमाणपत्र दिले. कर्जदारांनी हे दागिने बँकेकडे गहाण ठेवले. त्याबदल्यात बँकेने २२ लाख ७८ हजार रुपयांचे कर्ज दिले. प्रत्यक्षात कर्जफेड न झाल्याने बँकेने दागिन्यांची तपासणी केली. तेव्हा ते खोटे असल्याचे आढळून आल्याने आता फसवणूकीचा (Cheating Case) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक सावळे (Sub-Inspector of Police Sawle) तपास करीत आहेत.
Tags :
688
10