खेर्डै गावच्या सरपंचपदी प्रतिभा शेळके यांची निवड
पाथर्डी- प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील खेर्डै गावच्या सरपंचपदी सौ. प्रतिभा अंबादास शेळके यांची बिनविरोध निवड करण्यात आली. असराबाई बाबासाहेब सांगळे यांचा ग्राम पंचायत सदस्य यांच्या ठरावाप्रमाणे अडीच वर्षाचा कार्यकाल पुर्ण झाल्याने प्रतिभा शेळके यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी उप सरपंच योगेश सिताराम जेधे, ग्राम पंचायत सदस्य सौ.सविता भाऊसाहेब सांगळे, राजेंद्र दिपाहरी ठोंंबे, जालिंदर लक्ष्मण सांगळे,उर्मिला बाबासाहेब खोर्दै, यांच्या उपस्थितीमध्ये खेर्डे ग्रांमपंचायत सरपंचपदी सौ. शेळके यांची निवड करण्यात आली.यावेळी सरपंच सौ.प्रतिभा शेळके यांनी गावचा सर्वागीण विकास कसा होईल.याकडे जास्त लक्ष देणार असून ग्राम पंचायत च्या माध्यमातून गावात विविध योजना राबवणार असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी सर्व ग्रामस्थांनी नविन सरपंच निवड झालेल्या सौ.शेळके यांचा सत्कार करुन सर्व ग्रामस्थांनी अभिनंदन केले.तसेच पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.यावेळी सदिच्छा मंडळाचे अध्यक्ष बप्पासाहेब शेळके, अंबादास शेळके तसेच गावातील इतर पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.