पाथर्डी- युवा व्यावसायिकांच्या सदैव पाठीशी-आ. निलेश लंके
पाथर्डी- प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील नवतरुणांनी राजकारणात येण्यापूर्वी स्वतः चा व्यवसाय करून सेटल व्हावं,कुटुंबाला आर्थिक स्थैर्य मिळवून द्यावं मग राजकारणात प्रवेश करावा असे उद्गार पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी काढले.साकेगाव येथील नवीन हॉटेल च्या उदघाटन प्रसंगी तर बोलत होते,कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष शिवशंकर राजळे होते
राजकारणात येण्यापूर्वी मी आय टी आय केला, चहाच हॉटेल चालवलं,इतरही छोटी मोठी कामे केली आहेत,त्यामुळे सर्वसामान्यांना काय अडचणी असतात याची मला जाणीव आहे.विशेषतः नवीन व्यावसायिकांच्या धंदा सुरू करताना अनेक संकटांना सामोरे जावे लागते,परंतु या सर्वांवर मात करून चिकाटीने जो टिकतो तो मोठा होतो असे ते म्हणाले.
तर पाथर्डी तालुक्यातील रस्त्यांची अवस्था, उसउत्पादकांची हेळसांड बघून अस्वस्थ होते त्याबाबतीत वरिष्ठांनी लक्ष द्यावे असे शिवशंकर राजळे म्हणाले
या कार्यक्रमाला माजी सभापती गोकुळ दौंड,साकेगाव मा सरपंच गोरक्ष सातपुते,मार्केट चे संचालक विष्णू सातपुते,बंडू रासने,एकनाथ कसाळ,भारत वांढेकर, आप्पासाहेब नलावडे,संदीप पवार, काकासाहेब सातपुते, आसाराम सातपुते,डॉ अनंत सातपुते, महादेव घाडगे,नारायण गरड,आप्पा सातपुते,हॉटेल चे चालक प्रशांत गोरे,अमोल साठे उपस्थित होते.
(चहा वाल्यांना दिवस चांगले आहेत,मी चहा विकला, पंतप्रधान मोदींनी चहा विकला बघा आम्ही दोघे कोठे आहोत असे लंके यांनी म्हणताच उपस्थितांमध्ये हशा पिकला.)