महाराष्ट्र
सुरत-हैद्राबाद ग्रीनफिल्ड' च्या भूमापन प्रक्रियेस खडांबे खुर्द येथील शेतकऱ्यांनी केला विरोध
By Admin
सुरत-हैद्राबाद ग्रीनफिल्ड' च्या भूमापन प्रक्रियेस खडांबे खुर्द येथील शेतकऱ्यांनी केला विरोध
आधी मोबदला जाहीर करुन इतरही रास्त मागण्यांचा विचार करावा आसा आक्रमक पवित्रा घेतला..!!
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
वांबोरी
'सुरत-हैद्राबाद ग्रीनफिल्ड' च्या भूमापन प्रक्रियेस खडांबे खुर्द येथील शेतकर्यांनी केला कडाडून विरोध ; आधी मोबदला जाहीर करुन इतरही रास्त मागण्यांचा विचार करावा आसा आक्रमक पवित्रा घेतला..!!
केंद्र सरकारच्या महत्वकांक्षी आणि भारतमाला प्रकल्पातील नव्याने होऊ घातलेल्या सुरत-हैद्राबाद ग्रीनफिल्ड एक्सप्रेस-वे या महामार्गाच्या जमीन मोजनी प्रक्रिया करीता शेतकर्यांना नोटीसा बजावण्यात आल्या होत्या. गुरुवार ता. १५ सप्टेंबर रोजी सडे- वांबोरी रोडवरील सडे रेल्वेचौकी जवळील खडांबे नाका येथे खडांबे खुर्द, खडांबे बुद्रुक, सडे, वांबोरी या गावांतील ७० ते ८० शेतकरी आणि महिला या मोजणी प्रक्रियेला विरोध करण्यासाठी उपास्थित होते.
ग्रीनफिल्ड एक्सप्रेस-वे या महामार्गाच्या जमीन मोजनीसाठी राहुरी येथील भूमिअभिलेख विभागाचे भूमापन अधिकारी अं.अं. कुलकर्णी यांच्या समवेत सुरत-हैद्राराबाद ग्रीनफिल्ड (NHAI) ची सर्व्हेअर एजन्सी आर. व्ही. असोसिएट च्या वतीने आधिकरी आणि कर्मचारी तसेच भूमिअभिलेख विभागाचे अधिकारी येणारं असल्याने खडांबे येथील कामगार तलाठी श्री. अमोल कदम, व त्यांचे सहकारी दिपक मकासरे , आले होते.
सुरत-हैद्राबाद महामार्गासाठी जमीन संपादित करण्याबाबत शेतकर्यांना नोटीसा बजावण्यात आल्या होत्या. आज त्यावर शेतकर्यांनी तिव्र विरोध करत बहुतांश बाधीत शेतकरी हे अल्पभुधारक असून रस्त्यात जमिनी गेल्यास शेतकरी भुमिहिन होइल. तसेच गावात प्रदूषण होवून इतर शेती देखील नापिक होइल. गावातील सर्व शेतकरी व त्यांचे कुटुंबाची उपजीविका ही शेतीवर अवलंबून असल्याने त्यांच्यावर शेतकर्यांवर उपासमारीची वेळ येउन. शेतकरी देशोधडीला लागेल. तसेच शासनाने तीन वर्षावरील खरेदी-विक्री व्यवहाराची सरासरी काढून मोबदला देण्याच्या निर्णयावर शेतकर्यांनी नाराजी व्यक्त करतं या मोजनी प्रक्रियेला तीव्र विरोध दर्शवीला. आणि मोजणी करणाऱ्याकरीता आलेल्या आधीकारी आणि कर्मचारी यांना मोकळ्या हाताने मागे पाठविले.
शेतकर्यांना विश्वासात न घेता तसेच शेतकर्यांच्या हरकती विचारात न घेता, हुकूमशाही पद्धतीने कार्यवाही करण्यात येत आहे. शेतकऱ्यांच्या जमीनीची मोजणी प्रक्रिया राबविली जात आहे. बागायती जमिनीबाबत राजपत्रात जमिनीच्या नोंदी जिरायती क्षेत्र म्हणून केलेल्या चुकीच्या नोंदी दुरुस्त करण्यात याव्यात. जमिनीच्या मोबदल्या बाबत जमिनीचे स्थानिक बाजारमूल्य विचारात घेऊन प्रथम मोबदला जाहीर करावा, नंतरच पुढील कार्यवाही करावी. 7/12 उतार्यावरील हुकुमशाही पद्धतीने केलेल्या नोंदीबाबत शेतकर्यांच्या मालकीच्या जमिनीच्या 7/12 उतार्यावर घेतलेल्या हरकतीच्या मुद्यांवर कोणतीही चर्चा न करता 7/12 उतार्याच्या इतर हक्कात केलेली महामार्गाची नोंद तात्काळ रद्द करावी. सर्विस रोडबाबत शेतकर्यांच्या शेतात जाण्यासाठी सर्व्हिस रोड व पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठीच्या उपाययोजना कराव्यात, ठिकठिकाणी अंडर पास करणे गरजेजेचे आहेत त्याबद्दल ही कोणताच निर्णय आद्याप झालेला नाही आदी. मागण्यांचा विचार करून योग्य तो निर्णय शासनाने घ्यावा.
"बाधीत शेतकरी हे अल्पभुधारक असून सुरत-हैद्राबाद महामार्गात जमिनी गेल्यास शेतकरी भुमिहिन होइल. तसेच गावात प्रदूषण होवून इतर शेती ना पिक होइल. गावातील सर्व शेतकरी व त्यांचे कुटुंबाची उपजीविका ही शेतीवर अवलंबून असल्याने शेतकर्यांवर उपासमारीची वेळ येइल. तसेच हा रस्ता नेमकी किती फुटाचा असणार आहे ७० का १०० फूट हे ही शेतकऱ्यांना आधी लेखी स्वरूपात कळवावे."
- श्री. संजय हरिश्चंद्रे, शेतकरी खडांबे खुर्द.
----------------------------------------------
"शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच सुरत हैदराबाद या राष्ट्रीय ग्रीनफिल्ड महामार्गाची सविस्तर, लिखीत स्वरुपात माहिती द्यावी तसेच जमिनीचा मोबदला. हा चालू बाजार भावा प्रमाने द्यावा. अन्यथा जमिनीची मोजणी प्रक्रियेचे काम करू दिले जाणार नाही."
- श्री. सर्जेराव पटारे, शेतकरी खडांबे खुर्द.
------------------------------------
"केंद्र सरकारचा सुरत चेन्नई एक्स्प्रेस वे शासनाच्या दृष्टिने जरी महत्वाचा आसला तरी आम्हां शेकऱ्याच्या दृष्टिने आमचे कुटुंब ही तितकेच महत्वाचे आहे माझ्या कुटुंबीयाचे उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन शेती आहे. आणि याच शेतीतून जर हा महाहामार्ग जाणार असेल तर मी माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करनार.भूसंपादनातून मिळालेल्या पैशातून मी किती दिवस उपजीविका चालवणार,दुसरीकडे जामीन खरेदी करावयाची असल्यास या जमीनीचे मूल्यांकन हे स्थानिक आणि चालू बाजार भावाने व्हावे. तसेलिखी तस्वरूपात आश्वासन द्यावे. असे न झाल्यास आम्ही कोणत्याही अधिकारी वा कर्मचाऱ्यास मोजणी प्रक्रिया किंवा इतर कामी शेतात येऊही देणार नाही"
- श्री. गणेश पारे. शेतकरी खडांबे खुर्द.
------------------------------------
"सुरत-हैद्राबाद मार्गाच्या भुसंपदानासाठी आमच्या जमिनी जात आहेत. आमचा विरोध हा शासनाला नसून शासनाच्या चुकीच्या कार्यपद्धतीवर आहे. त्या कार्यपद्धतीत सुधारणा करुन सर्व बाधीत शेतकरयांना विश्वासात घेऊनच पुढील निर्णय घ्यावेत. आणि सर्व बाधीत शेतकऱ्यांच्या मागण्यांच्या बाबतीत विचार विनिमय होण्याकरिता समीती गठीत करुन पुढील निर्णय घ्यावेत."
-श्री.देविदास कल्हापुरे शेतकरी खडांबे.
--------------------------------------------
माझी जमीन ही वडिलोपार्जित असुन ती मला वारसाक्काने मिळालेली आहे. परंतु माझी शेती या हायवेसाठी संपादित झाली, तर मी माझ्या पुढील पिढीला वारसाक्काने काय द्यावे. त्यापेक्षा आम्हाला शासनाने तरतुद करून जमिनीच्या बदल्यात जमिनी दिल्या पाहिजे आणि आमच्या सर्व रास्त मागण्यांचा शासनस्तरावर सर्वसमावेशक असा योग्य विचार विनिमय होण्याकरिता यापूर्वी अनेकदा निवेदने देलेली आहेत परंतू त्याचा अजूनही विचार झालेला नाही. म्हणून आता आम्ही मागे हटणार नाही प्रसंगी रक्तपात करण्याची गरच भासली तरी ही आमची तयारी आहे.
-श्री. नानासाहेब हरिश्चंद्रे. शेतकरी खडांबे.
---------------------------------------------
"माझ्या शेतात खुला गाई गोठा असून त्यामधून हा हायवे जाणार आहे मी लाखो रूपयांची गुंतवणूक करून हा व्यवसाय सुरू केलेला आहे. माझी शेती संपादित झाली, तर माझा दुग्धधंदा मोडकळीस येणार असुन मोठ्याप्रमाणवर नुकसानहोणारआहे. तसेच राहती घरे, कूपनलिका आणि विहिरी देखील या भूसंपादनात जाणार असल्याने त्यांचा मोबदला कश्या पद्धतीने मिळणारं आहे हे आधी जाहिर करावे."
-श्री.अविनाश कल्हापुरे,शेतकरी खडांबे.
--------------------------------------------
या महामार्गाच्या जमीन मोजनी प्रक्रियेला विरोध करण्यासाठी गणेश पारे,देविदास कल्हापुरे,प्रभाकर हरिश्चंद्रे,संजय हरिश्चंद्रे, नानासाहेब हरिश्चंद्रे, प्रकाश हरिश्चंद्रे,मंगेश हरिश्चंद्रे, देविदास खळेकर, शब्बीर पठाण,सर्जेराव पटारे, रवींद्र हरिश्चंद्रे, विकास खळेकर,मयूर हरिश्चंद्रे,भाऊ हरिश्चंद्रे,शिवाजी खळेकर, वसंत साबळे,शामराव हाडोळे, सुरेश काचोळे, प्रकाश कल्हापुरे, मल्हारी हरिश्चंद्रे, प्रशांत हाडोळे, दत्तात्रय पवार, सुरेशराव धोंडे, किशोर हरिश्चंद्रे,भाऊसाहेब खळेकर,जनार्दन मकासरे,अविनाश कल्हापुरे,प्रसाद पवार, बाळासाहेब कल्हापुरे,किशोर पवार,अभिनव काळे, गणेश लहारे, किरण हरिश्चंद्रे,स्वप्निल खळेकर, दीपक नन्नवरे,ज्ञानदेव साळवे,विकास साळवे, बाबासाहेब हरिश्चंद्रे, बाबसाहेब धोंडे, मकरंद कारले, किरण कल्हापुरे,दत्तात्रय दळवी, नानासाहेब अकोलकर, गंगाराम कारले, राहुल कल्हापुरे, किरण कल्हापुरे, बाळासाहेब हरिश्चंद्रे, चंद्रकांत पवार, तसेच सौ. मंदाबई बाबासाहेब पटारे,सौ. विणा सर्जेराव पटारे,सौ. सविता अशोक साळवे आदी.बाधीत शेतकरी, महीला भगिनी, तरुणवर्ग मोठया प्रमाणात उपस्थीत होता.
Tags :
8973
10