Breaking-'या' पंचायत समिती सदस्यावर हनीट्रॅप? 'त्या' महिलेने लाखो उकळले
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
अहमदनगरमधून हनी ट्रॅप सारख्या अनेक घटना समोर आल्या. यात विशेषतः संगमनेर मधून अनेक घटना समोर आल्या.
आता एक धक्कादायक बातमी समोर आले आहे. जिल्ह्यातील एका पंचायत समितीच्या सदस्य हा हनीट्रॅप मध्ये अडकला आहे.
सदर महिलेने त्या पंचायत समितीच्या सदस्याचे 'तसले' व्हिडीओ बनवून लाखो रुपयांना गंडा घातला आहे. दरम्यान या प्रकरणास कंटाळून अखेर तो व्यक्त पोलीस ठाण्यात आला अन त्याने कम्प्लेंट दिली आहे.
पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी या महिलेला अटक करण्यात आली असून तिचा साथीदार पसार आहे. सदर महिला परिचारिका असल्याचे समजते.
पीडित व्यक्ती व आरोपी संगमनेर तालुक्यातील आहेत. अधिक माहिती अशी : संगमनेर तालुक्यातील सुकेवाडी येथील महिलेने तिच्या साथीदारासह फिर्यादीची राहाता तालुक्यातील बाभळेश्वर येथील एका हॉटेलात व्हीडीओ क्लीप बनवली. या महिलेची व फिर्यादीची ओळख होती.
त्या ओळखीने ही महिला आर्थिक परिस्थिती गरीबीची आहे, असे सांगत वेगवेगळ्या कारणांसाठी वेळोवेळी हात उसने म्हणून पैसे मागायची. असे तिने लाखो रुपये घेतले. हे पैसे परत मागूनही ते दिले नाही.
अचानक 7 मार्च 2022 रोजी या महिलेने फिर्यादीला फोन करून बाभळेश्वर येथील एका हॉटेलवर बोलावले. दुसर्या दिवशी 8 मार्च रोजी फिर्यादी हॉटेलवर गेला. रुममध्ये गेल्यावर या महिलेने पैसे मोजून घ्या, असे म्हणत दरवाजा लावून त्यानंतर काही वेळातच एक पुरूष रुममध्ये आला.
त्याने या महिलेचे कपडे काढले व व्हीडीओ रेकॉर्डिंग करून माझे व या महिलेचे संबंध आहेत, असे वदवून घेतले व त्याचीही रेकॉर्डिंग केली. कुणाला काही सांगितले, तर जीवे ठार मारण्याची व व्हीडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यानंतर माझ्याकडून लाखो रुपये. अधिक तपास पोलीस करत आहेत.