महाराष्ट्र
भट्टीवाडी शाळेत गुणवंत विद्यार्थी सत्कार व विविध उपक्रमांसह विद्यार्थ्यांना निरोप
By Admin
भट्टीवाडी शाळेत गुणवंत विद्यार्थी सत्कार व विविध उपक्रमांसह विद्यार्थ्यांना निरोप
पाथर्डी- प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील करंजी येथील जिल्हा परिषद भट्टीवाडी शाळेत गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव व विविध आगळ्या-वेगळ्या उपक्रमाससह इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ मोठ्या उत्साहात नुकताच पार पडला.
कोरोना कालखंडात सुमारे दोन वर्ष शाळा विद्यार्थ्यांसाठी बंद होत्या, परंतु या कालखंडात जि.प.भट्टीवाडी या एकमेव शाळेतील विद्यार्थ्यांच्या विविध शैक्षणिक कार्यक्रमांची निवड करून ऑलइंडिया आकाशवाणी अहमदनगर व रेडिओ नगर एफ.एम यांनी सातत्याने प्रसारण केले.या कार्यक्रमांमुळे जिल्हाभरातील सर्व विद्यार्थ्यांना लाॅकडाऊनमध्ये घरबसल्या विविध शैक्षणिक ज्ञान व अनुभुती घेता आल्या.असे कार्यक्रम आकाशवाणी व रेडिओ नगर एफ.एम वर सादर करणारी जिल्ह्यातील ही एकमेव शाळा ठरल्याने या सर्व विद्यार्थ्यांना आकाशवाणी व रेडीओ एफ.एमतर्फे मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपञ देवुन गुणगौरव करण्यात आला.
या बरोबरच या शाळेतील विद्यार्थ्यांनी कोरोना लाॅकडाऊनमध्ये विविध प्रज्ञाशोध परिक्षांमध्ये आॅनलाईन सहभागी होत जिल्हास्तरापर्यंत तर विविध सहशालेय स्पर्धांमध्ये राज्यस्तरापर्यंत यश संपादन केले.त्या विद्यार्थ्यांचाही गुणगौरव करण्यात आला.
मंथन प्रज्ञाशोध परिक्षा,ज्ञानोदय प्रज्ञाशोध परीक्षा या परिक्षांसह,सकाळ आयोजित बालचिञकला स्पर्धा,पंचायत समिती आयोजित तालुकास्तरीय बालचिञकला स्पर्धा या स्पर्धेतील यशस्वींचा गौरव करण्यात आला.जिल्हा परिषद आयोजित विविध गुणदर्शन स्पर्धेत सलग दोन वर्ष या शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धेत जिल्हास्तरावर यश संपादन केले आहे, त्या यशस्वी विद्यार्थ्यांचाही सन्मान केला.
भट्टीवाडीचे भुमीपुञ छानराज क्षेञे यांना राज्यस्तरीय पर्यावरणमिञ पुरस्कार मिळाल्याबद्दल शाळेतर्फे त्यांना सत्कार करण्यात आला.जिल्ह्यातील पहिला नवोपक्रम शाळेचा लोगो व "स्ट्राॅंग रूट- स्ट्राॅंग फ्यूचर" हे ब्रीदवाक्य असलेले बॅचबटन या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचेही अनावरण करंजी गावचे सरपंच बाळासाहेब अकोलकर यांच्याहस्ते केले.
यावेळी विद्यार्थ्यांनी रेखाटलेल्या सुंदर चिञांचे भव्य प्रदर्शनही भरवण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन शिक्षणविस्तार अधिकारी अभयकुमार वाव्हळ व विषयतज्ज्ञ राहुल अकोलकर यांनी केले.
कार्यक्रमाच्या सुरूवातीला बम बम भोले या लक्षवेधी नृत्यगीताद्वारे विद्यार्थ्यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.या बरोबरच शेतकरी नृत्य व विविध बहारदार सांस्कृतिक कार्यक्रमही सादर केले.
राज्यातील पहिलाच उपक्रम डिस्को रींग डान्स कवायतद्वारे विद्यार्थ्यांनी सर्व उपस्थितांचे मने जिंकले.
कोरोना लाॅकडाऊन काळात २०१९-२०पासुन चौथीचे एकुण तीन वर्ग पाचवीत गेले, त्या तिनही वर्षीच्या सर्व विद्यार्थ्यांना या कार्यक्रमात एकञीत बोलावुन त्यांना विविध भेटवस्तुदेण्यात आल्या.या बरोबरच या प्रत्येक वर्गातील आदर्श विद्यार्थ्यांना कै.रघुनाथ मुटकुळे यांच्या स्मरणार्थ गुणवंत विद्यार्थी पुरस्काराने सन्मानित केले. पालक मेजर सचिन अकोलकर यांच्यावतीने उपस्थित सर्व विद्यार्थी व पालकांना भोजन देण्यात आले.ग्रामपंचायत समिती सदस्य नवनाथ आरोळे,विवेक मोरे व कुशल भापसे मिञमंडळ यांच्यातर्फे सर्व विद्यार्थ्यांना शालेयोपयोगी पुस्तके व विविध वस्तुंचे वाटप करण्यात आले.मुलांच्या गुणवत्तेवर खुश होवुन सरपंच बाळासाहेब अकोलकर यांनी खाऊवाटपासह शाळेस पाच हजार रूपयांचे रोख बक्षीस दिले.शाळा व्यवस्थापन अध्यक्ष संदिप क्षेञे व उपाध्यक्षा मनिषा संतोष क्षेञे यांनी शाळेस खुर्च्या भेट दिल्या.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच बाळासाहेब अकोलकर,प्रमुख पाहुणे शिक्षणविस्तार अधिकारी अभयकुमार वाव्हळ,विषयतज्ज्ञ राहुल अकोलकर यांसह ग्रामपंचायत समिती सदस्य नवनाथ आरोळे,उत्तमराव अकोलकर,वसंत क्षेञे,छानराज क्षेञे,मारूती क्षेञे,विकास क्षेञे,अजय क्षेञे,छगनराव क्षेञे,संतोष क्षेञे,सखाराम क्षेञे,रावसाहेब क्षीरसागर यांसह तिसगावचे मेहताब पठाण,किशोर बोरसे,काकासाहेब लवांडे,अज्जुभाई,सिकंदर पठाण,सचिन भावले,आजिनाथ भावले आदींसह मोठ्यासंख्येने पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.
संपुर्ण कार्यक्रमाचे नियोजन व सुञसंचलन मुख्याध्यापक जयराम सातपुते व शिक्षक परमेश्वर भवर यांनी केले.
Tags :
114
10