मुख्यमंत्री किसान योजना'; शेतकऱ्यांना मिळणार आर्थिक लाभ
By Admin
मुख्यमंत्री किसान योजना'; शेतकऱ्यांना मिळणार आर्थिक लाभ
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
मोठी बातमी ! आता राज्यातही 'मुख्यमंत्री किसान योजना' लागू होणार, शेतकऱ्यांना मिळणार लाभलवकरच राज्यात मुख्यमंत्री किसान योजना लागू होणारनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निर्णय घेतल्याची शक्यताकाय आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना
राज्यातील शेतकऱ्यांसाठी शिंदे फडणवीस सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर आता महाराष्ट्रातही मुख्यमंत्री किसान योजना लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेतला जात आहे.
या योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना वर्षाकाठी 6 हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाणार आहे. तीन दिवसांपूर्वी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे. येत्या आर्थिक वर्षातील 2023 च्या अर्थसंकल्पात याबाबत तरतूद करण्यात येणार आहे.
सध्या देशपातळीवर प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना राबवली जात आहे. याच योजनेच्या धर्तीवर राज्यात मुख्यमंत्री किसान योजना राबवत पात्र शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षी सहा हजार रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. ही योजना लागू झाल्यास शेतकऱ्यांसाठी शिंदे फडणवीस सरकारने घेतलेला हा मोठा निर्णय ठरेल. या योजनेस पात्र शेतकऱ्यांना प्रत्येक महिना टप्प्याटप्प्याने सहा हजार दिले जातात. प्रत्येक वर्षी सहा हजारांची ही मदत शेतकऱ्यांना दिली जात आहे.
मात्र महाराष्ट्रात ही योजना कशा पद्धतीने राबवली जाणार आहे, याबाबतची माहिती स्पष्ट नाही, मात्र सरकार लवकरचं याबाबत निर्णय घेण्याची शक्यता आहे. परंतु अर्थसंकल्पात या योजनेसाठी किती रुपयांची तरतूद करण्यात येईल याबाबतची माहिती समोर आलेली नाही. तसेच या योजनेसाठी कोणते शेतकरी पात्र ठरतील याबाबतची माहितीही मिळालेली नाही. मागील अनेक दिवसांपासून कृषी विभागाच्या बैठकीत यावर चर्चा सुरु असल्याची माहिती आहे.
आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेतकरी मतदारांना वळवण्यासाठी शिंदे फडणवीस सरकार हा निर्णय घेण्याची शक्यता असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
लवकरच राज्यात मुख्यमंत्री किसान योजना लागू होणार
राज्यात लवकरच मुख्यमंत्री किसान योजना लागू करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. या आर्थिक वर्षात बजेटमध्ये तरतूद देखील करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना वर्षाला या योजनेद्वारे सहा हजार रुपये देण्यात येणार आहेत. मात्र, ते कशा पद्धतीने देणार याबाबत आणखी माहिती मिळालेली नाही. लवकरच याबाबतचा निर्णय राज्य सरकारनं घेणार आहे. अर्थसंकल्पात या योजनेसाठी किती रुपयांची तरतूद करण्यात येमार याबाबतची माहिती अद्याप मिळालेली नाही. मात्र, सरकार लवकरच घोषणा करण्याची शक्यता आहे. तसेच या योजनेसाठी कोणते शेतकरी पात्र ठरतील याबाबत देखील अद्याप काही माहिती मिळालेली नाही. मात्र, मागील तीव दिवसापूर्वी कृषी विभागाच्या बैठकीत यावर चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निर्णय घेतल्याची शक्यता
दरम्यान, आगामी काळात महानगर पालिकांच्या निवडणुका येत आहेत. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका देखील येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर शेतकरी मतदार आपल्याकडे वळवण्याचा शिंदे-फडणवीस सरकारचा प्रयत्न असण्याची शक्यता आहे.