शिवरायाचे विचार फक्त घोषणा आणि मिरवणूकीपुरते सिमित राहू नये.- शिव व्याख्याते गणेश शिंदे
By Admin
शिवरायांचे विचार फक्त घोषणा आणि मिरवणुकीपुरते सीमित राहू नये - शिव व्याख्याते गणेश शिंदे
पाथर्डी- प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती व मा.आमदार मोनिकाताई राजीव राजळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिव व्याख्यान व अभिष्टचिंतन सोहळा
कासार पिंपळगाव येथे संपन्न झाला.यावेळी कार्यक्रमास शेवगाव पाथर्डीच्या आमदार मोनिकाताई राजळे यांची प्रमुख उपस्थिती होती. अध्यक्षस्थानी माजी मुख्याध्यापक आर.वाय म्हस्के होते.
छत्रपती शिवाजीमहाराज व आजचा युवक या विषयावर गणेश शिंदे यांनी मंत्रमुग्ध करणारे व्याख्यान दिले.
मुलांवर जिजाऊंसारखे संस्कार करावेत.शिवरायांचे विचार फक्त घोषणा आणि मिरवणुकीपुरते सीमित न राहता दैनंदिन जीवनात जगताना आचरणात आणावेत. सध्याच्या तरुणांनी स्वतः च्या उदयोग व्यवसायाकडे वळून आत्मनिर्भर बनण्याचा प्रयत्न करावा.
यावेळी बोलताना आमदार मोनिकाताई राजळे म्हणाल्या की, आजच्या तरुणांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्वधर्मसमभावाच्या विचारांचा जागर केल्यास जीवन समृद्ध बनेल. शिवाजी महाराजांचे कर्तृत्व हे प्रत्येकासाठी स्फूर्ती देणारे आहे. कुशल प्रशासक, पराक्रमी योद्धा, आज्ञाशील पुत्र, जाणता राजा अशा अनेक अंगांनी शिवरायांचे व्यक्तिमत्व महत्त्वाचे मानले जाते. एकाच वेळी अनेक बलाढ्य शत्रूंशी लढून रयतेसाठी स्वराज्याचे स्वप्न साकार करणाऱ्या शिवरायांनी जगाला आदर्श घालून दिला.
यावेळी हार,शाल,फेटा याला फाटा देत पाहुण्यांचा सत्कार पुस्तके देऊन करण्यात आला. सत्कारात पुस्तके देण्याच्या संकल्पनेचे आमदार मोनिकाताई राजळे व गणेश शिंदे यांनी जाहीर कौतुक केले.
यावेळी मोनिकाताई राजळे व गणेश शिंदे यांच्या हस्ते गावातील स्व.राजीव राजळे वाचनालयास MPSC,UPSC व इतर स्पर्धा परीक्षेची पुस्तके देण्यात आली. वि. का. का सोसायटी,कासार पिंपळगाव यांच्या वतीने वाचनालयास पुस्तके खरेदीसाठी ५०००/- रुपयांचा धनादेश देण्यात आला.
कार्यक्रमास गावच्या सरपंच सौ. मोनाली राहुल राजळे,उपसरपंच आशा उमेश तिजोरे,चेअरमन वसंतराव भगत,व्हा. चेअरमन डी. व्ही. म्हस्के तसेच सेवा सोसायटीचे सर्व सदस्य,ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य गावातील सर्व जेष्ठ मान्यवर,युवक,युवती,महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुधीर शेळके व सुत्रसंचालन प्रवीणकुमार तुपे आभार तुषार तुपे यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्व.राजीवजी राजळे मित्र मंडळ कासार पिंपळगाव यांनी अथक परिश्रम घेतले.