महाराष्ट्र
कंटेनर आणि मालवाहतूक ट्रकचा भीषण अपघात
By Admin
कंटेनर आणि मालवाहतूक ट्रकचा भीषण अपघात
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
श्रीगोंदा तालुक्यातील कन्हेरवळ येथे कंटेनर आणि एका मालवाहतूक ट्रकच्या समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात ३ जण गंभीर जखमी झाले.
यातील एकाची प्रकृती चिंताजनक आहे.या बाबत सविस्तर माहिती अशी की, नगरकडून दौंडकडे भरधाव वेगाने जाणारा मालवाहतूक कंटेनर (क्र. एम.एच.०६ ए क्यू ८४२२) आणि दौंडकडून नगरकडे भरधाव वेगाने जाणारी माल वाहतूक ट्रक (क्र. के ए.२८ ए ए ५३६३) यांची कोळगाव येथील कन्हेरवळ परिसरात समोरासमोर भीषण धडक झाली.
दोन्ही वाहनांचा अपघात इतका भीषण होता की, या अपघातात कंटेनरच्या केबिनचा चुराडा होऊन कंटेनर चालकाचे दोन्ही पाय निकामी झाले असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. तर ट्रकचा चालक आणि दोन्ही गाड्यांचे क्लिनर गंभीर जखमी झाले आहेत.
या परिसरातील रस्त्याचे काम अपूर्ण असल्याने भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनांना रस्त्याचा अंदाज येत नसल्याने रोज अपघात होत आहेत. या अपघातात अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

Tags :
63367
10