कळसपिंपरी वि.का. सोसायटी चेअरमन पदी नवनाथ भवार, व्हा. चेअरमन पदी अमीन शेख
पाथर्डी- प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील कळसपिंपरी गावातील
राजकीय दृष्टीने महत्वाचे समजल्या जाणाऱ्या वि.का. सोसायटी या संस्थेचे आमदार मोनिका राजळे यांच्या वर्चस्वाने 12 सदस्य बिनविरोध निवड करण्यात आली होती.तर आज या संस्थेची चेअरमन पदावर नवनाथ शेठ भवार यांची नेमणूक करण्यात आली. त्यांना मा.व्हा. चेअरमन यमाजी शेठ चव्हाण यांनी अनुमोदन दिले. तर व्हा. चेअरमन पदी अमीन भाई शेख यांची निवड करण्यात आली. त्यांना सरपंच दिगू शेठ भवार यांनी अनुमोदन करण्यात आले.
यावेळी चेअरमन व व्हा. चेअरमन यांचा व सर्व संचालक मंडळ यांचा सन्मान करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी हरिहरेश्वर पँनलचे अध्यक्ष भाऊसाहेब भवार,
सचिव तात्यासाहेब काकडे, बाबासाहेब किलबिले, अधिकारी थोरात मॅडम यावेळी उपस्थित होत्या.