गावच्या विकासासाठी राजकीय मतभेद विसरून एकत्र या- दादासाहेब फुंदे
पाथर्डी - प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्वाची असणाऱ्या भुतेटाकळी ग्रामपंचायत सरपंचपदी श्री. तुकाराम फुंदे यांची निवड झाल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता.
यावेळी दादासाहेब फुंदे, शिवप्रसाद फुंदे, बाळासाहेब फुंदे, एकनाथ फुंदे, शेषनारायण फुंदे यांनी नवनिर्वाचित सरपंच तुकाराम फुंदे यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमात बोलतांना दादासाहेब फुंदे म्हणाले, गावचा विकास करायचा असेल तर युवकांनी राजकीय मतभेद विसरून एकञ आले पाहिजे, राजकारण हे फक्त निवडणुकापुरतेच मर्यादित ठेऊन विकासकामासाठी सर्वांनी प्राधान्याने एकञ काम करणे गरजेचे आहे. राजकारणात चांगल्या माणसाला जपल पाहिजे व त्याला साथ दिली पाहिजे.
सत्काराला उत्तर देतांना तुकाराम फुंदे म्हणाले, सर्वांना सोबत घेऊन विकासाच्या योजना राबवणार, जनतेने माझ्यावर जो विश्वास टाकला आहे, त्याला कधीही तडा जाऊ देणार नाही.
या वेळी संदिप फुंदे, अमोल फुंदे,गोकुळदास फुंदे, अजिनाथ फुंदे, ऋषिकेश वारे, बाबासाहेब फुंदे, ज्ञानेश्वर फुंदे, गणेश फुंदे,सुरेश फुंदे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.