कुटुंबावर दुःखाचा डोंगर देवदर्शनासाठी जाताना अपघात, २ ठार, ३ जखमी
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
हा अपघात पहाटेदीड वाजेच्या सुमारास झाला.
सुशीला विलास रासकर (रा.खंडाळा ता. श्रीरामपूर), श्याम बाळासाहेब रासकर( रा.खंडाळा ता. श्रीरामपूर ) असे मयताची नावे आहेत. तसेच विलास अविनाश रासकर,आनंद विलास रासकर, शिल्पा शाम (सर्व राहणार खंडाळा ता. श्रीरामपूर) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत.
नगर- मनमाड रोड वरील देहरे शिवारात ट्रेलरमधील पवनचक्कीसाठी वापरला जाणारा पंखा बोलेरो गाडीवर पडून झालेल्या अपघातात दोन जण जागीच ठार झाले असून, तीन जण जखमी झाले आहेत.
त्यांना पुढील उपचारासाठी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. श्रीरामपूर तालुक्यातील रासकर कुटुंबीय देवदर्शनासाठी निघाले होते. नगर कडून मनमाड कडे जात असलेल्या ट्रेलरमधून पवनचक्की साठीचा पंखा बोलेरो गाडीवर समोरून पडला. त्यामुळे झालेल्या अपघातात दोघे जण जागीच ठार झाले असून तिघे जण जखमी झाले आहेत.