महाराष्ट्र
733
10
पाथर्डी तालुक्यातील 'या' दोन गावामध्ये जुगार अड्ड्यांवर छापा
By Admin
पाथर्डी तालुक्यातील 'या' गावामध्ये जुगार अड्ड्यांवर छापा
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील तिनखडी व करोडी या दोन ठिकाणी सुरू असलेल्या जुगार अड्यावर पाथर्डी पोलिसांनी छापा टाकून जवळपास पाच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करत जुगार खेळणार्या नऊ जणांना ताब्यात घेतले आहे.
या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिनखडी व करोडी या दोन गावात जुगार चालू असल्याची माहिती पोलिस निरीक्षक सुहास चव्हाण यांना समजताच चव्हाण यांच्यासह सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण पाटील, पोलिस उपनिरीक्षक सचिन लिंमकर, पोलिस कॉन्सटेबल भगवान सानप, देविदास तांदळे, ईश्वर बेरड, अतुल शेळके, प्रल्हाद पालवे, ईश्वर गर्जे, एकनाथ गर्कळ, संदीप कानडे यांनी हि कारवाई करुन मोबाईल, दुचाकी असा मिळून एकूण पाच लाख सात हजार दोनशे दहा रुपयांचा ऐवज ताब्यात घेतला आहे.
पोलिस कॉन्स्टेबल देविदास तांदळे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, पोलिस निरीक्षक सुहास चव्हाण यांना गुप्तबातमीदारामार्फत बातमी मिळाली की, करोडी गावचे शिवारात सुनिल गोपीनाथ वारे याचे शेताचे कडेला असलेल्या शेडच्या पाठिमागे पाच ते सहा इसम पत्त्याचा हारजितीचा जुगार खेळत आहे. त्यानंतर दुपारी चार वाजण्याच्या सुमारास पोलिस निरीक्षक सुहास चव्हाण यांच्यासह पोलिस पथकाने छापा टाकुन सुनिल नवनाथ शिररसाट रा. पिंपळगाव टप्पा ,विष्णु सुखदेव दहिफळे वय 40 वर्ष,बळीराम विष्णु दहिफळे वय 40 वर्ष दोन्ही रा. महिंदा ता. आष्टी जि.बीड, विष्णु भगवान चिंतामणी, रा. विजयनगर, पाथर्डी, सुनिल गोपीनाथ वारे रा.करोडी ता. पाथर्डी, अशोक भगवान दहिफळे रा. महिंदा ता. आष्टी जि.बीड यांना ताब्यात घेतले.
जुगाराच्या खेळात मिळू अनालेला त्यांच्याकडून रोख रक्कम, मोबाईल, मोटार सायकल, कुलर व इन्वर्टरर असा 4 लाख 32 हजार 510 रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. पोलिस कॉन्स्टेबल एकनाथ अंबादास गर्कळ यांनी फिर्याद दिली. त्यात म्हटले आहे कि, तालुक्यातील तीनखडी शिवारात एका शेडमध्ये तिरट नावाचा जुगार खेळत आहेत. राहुल शेषराव खेडकर , योगेश आश्रवा बडे, सचिन पोपट खेडकर यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडील जुगाराचे साहित्य व रोख रक्कम, मोटारसायकल, मोबाईल फोन असा 74 हजार 690 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.मुंबई जुगार कायदा कलमान्वये पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहे.
Tags :

