विना परवाना दारुचा 4 लाख 36 हजारांचा साठा जप्त
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
नेवासा तालुक्यातील देवगाव येथे एका पत्र्याच्या - शेडमध्ये विनापरवाना ठेवलेला ४ लाख ३६ हजार रुपयांचा दारुसाठा नेवासा पोलिसांनी छापा टाकून जप्त केला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, नेवासा पोलीस ठाण्याचे पो.नि. विजय करे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, देवगाव ता.नेवासा जि.अहमदनगर येथील राहणार महेश बाळासाहेब दारकुंडे याच्या राहत्या घराच्या समोर पत्र्याचे शेडमध्ये विनापरवाना बेकायदेशीर दारुचे बॉक्स विक्री करण्याच्या उद्देशाने ठेवलेले आहेत. त्यानंतर लगेच पोलिस उपनिरीक्षक समाधान
भाटेवाल, पो.ना. राहुल यादव, पो. कॉ. गणेश ईथापे असे अधिकारी व पोलीस अंमलदार यांना वरील मिळालेली माहिती सांगुन लागलीच सदर ठिकाणी छापा मारण्यासाठी रवाना केले असता सदर ठिकाणी कार्ल्सबर्ग कंपनीच्या बिअरचे एकुण १५८ बॉक्स प्रत्येकी बॉक्स मध्ये १२ बॉटल अशा वर्णनाचा एकुण ४,३६,०८० /- रुपये किंमतीच्या बियरच्या बॉटल मिळुन आल्याने लागलीच सदरचे बॉक्स पंचासमक्ष पंचनामा करुन जप्त करुन नेवासा पोलीस ठाणे येथे आणलेल्या आहेत.
वरीलप्रमाणे केलेल्या कारवाईच्या अनुषंगाने गुन्हा दाखल करुन सदर गुन्ह्याचा पुढील तपास पो.ना. नितीन भताने हे करीत असुन सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. विजय करे, सहा.पो.नि. समाधान भाटेवाल , पो.ना. राहुल यादव, पो.कॉ. गणेश ईथापे व सर्व नेमणुक कर्मचारी यांनी संयुक्तपणे केली आहे.