महाराष्ट्र
मर्चंट बँक संचालकांना नोटीस ; 13 कोटींच्या फसवणूक प्रकरणी चौकशी
By Admin
मर्चंट बँक संचालकांना नोटीस ; 13 कोटींच्या फसवणूक प्रकरणी चौकशी
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
नगरमधील व्यावसायिकाने मर्चंट बँकेतून घेतलेले 13 कोटींचे कर्ज बुडविल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात संबंधित व्यावसायिकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याच्या तपासासाठी पोलिसांनी बँकेचे तत्कालीन अधिकारी व कर्मचारी अशा 17 जणांना चौकशीसाठी हजर राहण्यासाठी नोटीस बजावली आहे. शहरातील व्यापार्यांची बँक म्हणून ओळखल्या जाणार्या अहमदनगर मर्चंन्ट को-ऑपरेटिव्ह बँकेचे 13 कोटींचे कर्ज बुडविल्याप्रकरणी अनिल साळी (रा.अहमदनगर) या व्यावसायिकाविरोधात बँकेच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात होता.
त्यानंतर आता गुन्ह्याच्या तपासासाठी पोलिसांनी बँकेचे तत्कालीन अधिकारी व काही विद्यमान कर्मचार्यांना नोटीस बजावली असून, 28 ते 30 नोव्हेंबर दरम्यान चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे. बँकेचे मदन पनालाल मुनोत (तत्कालीन अधिकारी), अनुलिंग जगन्नाथ वसेकर (तत्कालीन जॉईट सीईओ), सुरेश हिरालाल कटारिया (तत्कालीन सीईओ), हस्तीमल चांदमल मुनोत (तत्कालीन चेअरमन), आनंदराम चंदनमल मुनोत, सुरेश हिरालाल कटारिया (तत्कालीन सीईओ), अजय अमृतलाल मुथा (सीए), मोहनलाल संपतलाल बरमेचा, कमलेश पोपटलाल भंडारी,
संजयकुमार फुलचंद चोपडा, अमित विजय मुथा, संजीव झुंबरलाल गांधी, मीना वसंतलाल मुनोत, प्रमिला हेमराज बोरा, विजय भागवतराव कोथिंबीरे, सुभाषराव मारूती भांड, संदीप नारायणदास लोढा या पदाधिकारी, संचालक,अधिकारी व कर्मचार्यांना चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस पोलिसांनी बजावली आहे.
नोटाबंदीत बँकेत गैरव्यवहार?
मर्चंट बँकेत नोटाबंदीच्या काळात खोटी खाती उघडून, त्यामध्ये मोठी रक्कम गैरप्रकारे डिपॉझिट करण्यात आल्याची तक्रार गिरीश जाधव (रा.अहमदनगर) यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात केलेली आहे. त्यामुळे नोटाबंदीच्या काळात बँकेत गैरव्यवहार झाला की नाही, याचीही चौकशी होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
मर्चंट बँकेकडून घेतलेले 13 कोटींचे कर्ज परत न करता फसवणूक केल्याप्रकरणी 2020 मध्ये गुन्हा दाखल आहे. तसेच नोटबंदीत बँकेत खोटी खाती उघडण्यात आल्याची तक्रार आहे, या दोन्ही प्रकरणाच्या चौकशीसाठी समजपत्र देण्यात आले आहे.
– युवराज आठरे, सहायक पोलिस निरीक्षक,
Tags :
450
10