महाराष्ट्र
अहमदनगर शिक्षक बँकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू
By Admin
अहमदनगर शिक्षक बँकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू
पाथर्डीमध्ये शिक्षक संपर्कात युवा नेतृत्व देवेंद्र अंबेटकर यांची आघाडी
पाथर्डी- प्रतिनिधी
प्राथमिक शिक्षकांचे राजकारण शिक्षक बँके भोवती फिरते ,हे सर्वांना माहीतच आहे. शिक्षक बँकेची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झालेली असून ,फॉर्म विक्री व फॉर्म भरणे दिनांक १७ जून ते २३ जून असून २४ जूनला फॉर्मची पडताळणी होणार असून ,दिनांक ११ जुलै रोजी फॉर्म मागे घेण्याची शेवटची मुदत आहे .१२ जुलै रोजी चिन्ह वाटप होणार असून प्रत्यक्ष मतदान २४ जुलै रोजी होणार आहे व २५ जुलै रोजी मतमोजणी होणार आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.
जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या संघटना पुरस्कृत सर्वच मंडळे या आखाड्यात उतरले असून मेळावे ,भेटीगाठी , कॉर्नर सभा, गल्ली सभा , रणनीती आखणे यांना उधाण आलेले आहे .सर्वच मंडळांनी शिक्षक बँकेत सत्ता मिळवण्यासाठी कंबर कसलेली आहे.
पाथर्डी तालुकाही या गोष्टीला अपवाद नाही. पाथर्डीतही चौकाचौकात शिक्षकांचे प्रमाण लक्षणीय दिसून येत आहे.पाथर्डी मध्ये गुरुमाऊली (रोहकले गट ),गुरु माऊली (तांबे गट ) , गुरुकुल मंडळ, स्वराज्य मंडळ , सदिच्छा मंडळ ही प्रमुख मंडळे असून प्रत्येक मंडळ आपापली ताकद दाखविण्यासाठी भेटीगाठी ,कॉर्नर सभा, उमेदवार चाचपणी मेळावे ,कार्यालय उद्घाटन यात व्यस्त आहेत.
यावेळी प्रमुख आकर्षण म्हणजे प्राथमिक शिक्षक बँकेच्या निवडणुकीत स्वराज्य मंडळाने पूर्ण ताकतीने उडी घेतली असून त्यांच्या भेटीगाठी मुळे, प्रचारामुळे व कोरी पाटी असल्याने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे .शिक्षक बँकेची निवडणूक आली की इतर मंडळेही आम्ही काम करतो हे दाखविण्याचा प्रयत्न करतात , परंतु स्वराज्य मंडळ हे पेन्शन हक्क संघटनेच्या माध्यमातून स्वतःच्या हक्कासाठी लढणाऱ्या युवकांच्या संकल्पनेतून स्थापन झालेले आहे. शिक्षक बँकेत होणाऱ्या कारभारावर जिल्ह्यातील शिक्षक मंडळी नाराज आहेत .तुलनेने रयत बँक , माध्यमिक शिक्षक सोसायटी, एचडीएफसी बँक इ. बँका सरस कामगिरी करत असून शिक्षक बँक कामगिरी खालावलेली आहे. हे हेरून तसेच तेच तेच लोक जे नाराज होऊन नवीन मंडळ स्थापन करतात व तेच सत्तेवर येऊन सभासदांच्या तोंडाला पाने पुसतात .सभासदांची लुट करतात. हे लक्षात आल्याने तरुणांनी एकत्र येऊन बँकेत बदल करण्यासाठी व सर्व सभासदांना न्याय मिळवून देण्यासाठी स्वराज्य मंडळ स्थापन केलेले आहे.
पाथर्डी मध्ये पेन्शन हक्क संघटनेच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षात शिक्षकांची लक्षणीय कामे करण्यात आलेली आहेत .विविध प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. पेन्शनच्या प्रश्नासाठी, वरिष्ठ वेतन श्रेणी, वैद्यकीय बीले , फरक बिले, पगार बिले, शैक्षणिक कामकाज ,एस जी एस पी खाते लाभ, हक्काचे वेतन विकल्प निवड, प्रशासकीय अडचणी सोडविणे ,शिक्षकांमध्ये समन्वय ठेवणे, इन्कम टॅक्स प्रश्नावर तोडगा काढणे, एलआयसी हप्ता मध्ये होणारी अनियमितता दूर करणे, शिक्षकांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी अग्रेसर असणे इत्यादी कामात सातत्याने पेन्शन हक्क संघटन व संघटनेचे पाथर्डी तालुका अध्यक्ष देवेंद्र अंबेटकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे.
पाथर्डी मध्ये सध्याच्या परिस्थितीत आपल्या कामाच्या व संपर्काच्या जोरावर देवेंद्र अंबेटकर हे मतदारांच्या समोर जात असून तालुक्यातून उत्तम प्रतिसाद भेटत आहे .त्यांचा शांत, संयमी, मुत्सद्दी, कायदेशीर ज्ञान ,सर्वांना सोबत घेऊन चालण्याची भूमिका , सहकार्य, न्याय या तत्वावर विश्वास ठेवून सहकार्याची भूमिका असल्यामुळे ते शिक्षकांमध्ये लोकप्रिय असून सर्वसामान्य शिक्षकांचे नेतृत्व म्हणून युवा नेतृत्व समोर आलेले आहे .येणाऱ्या निवडणुकीत जिल्ह्याचे लक्ष पाथर्डी तालुक्यावर लागलेले आहे.
महाराष्ट्रात डीसीपीएस धारकांना बँकेमार्फत दोन लाखांची मदत मिळवून देणारे नेतृत्व म्हणून देखील राज्यभर प्रसिद्ध आहेत. तसेच न्यायालयीन लढ्याच्या माध्यमातून जिल्ह्यातील पदवीधर शिक्षकांना सरसकट वेतनश्रेणीचा लाभ मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे.जुनी पेन्शन मागणीसाठी महाराष्ट्रातर्फे सर्वोच्च न्यायालयात दाद मागणारे एक निर्भीड व्यक्तिमत्त्व म्हणून महाराष्ट्रात त्यांचे नाव सर्वांना परिचित असून जिल्ह्यातील कानाकोपऱ्यात नाव पोहोचलेले आहे.
सध्याच्या परिस्थितीत कामाच्या जोरावर लोकप्रियतेच्या जोरावर स्वराज्य मंडळाकडून देवेंद्र अंबेटकर हे प्रमुख दावेदार असून, फक्त पाथर्डीत नव्हे तर जिल्ह्यातील संपर्कामुळे संपूर्ण स्वराज्य मंडळाला त्यांचा फायदा होणार आहे.
Tags :
29976
10