शेतकऱ्यांनी केली उसाची होळी;आंदोलनाचा तिसरा दिवस,शेतमजुरांना वाटले मोफत दूध
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
किसान क्रांती मोर्चातर्फे सुरू असलेल्या आंदोलनात आज शेतक-यांनी उसाची होळी केली. पुणतांबा ग्रामपंचायत सरपंच डॉ. धनंजय धनवटे यांच्या हस्ते होळी पेटविण्यात आली.
किसान क्रांती, शेतकरी संघर्ष समिती, हंसराज वढगुले, योगेश रायते, विठ्लराव जाधव, बाळासाहेब चव्हाण, मुरलीधर थोरात सुहास वहाडने, सुभाष वहाडने आदीसह शेतकरी उपस्थित होते.
कृषी मंत्री दादासाहेब भुसे यांनी आंदोलकांशी फोनवर चर्चा केली. उद्या भुसे हे तोडगा करण्यासाठी येणार असून त्यांच्या खात्याशी संबंधित मागण्या व इतर मागण्याचा संबंधित खात्याच्या मंत्र्यांशी चर्चा करूनच निर्णय घेणार असल्याचे भुसे म्हणाले.
जे प्रश्न येथे सुटतील ते सुटतील बाकीच्या मागण्या मसाठी मुख्यमंत्री उप मुख्यमंत्री यांच्याशी बैठकीद्वारे विचार करणार असल्याचे भुसे यांनी फोनद्वारे सांगितले. तूर्तास तिढा सुटण्याचा मार्ग मोकळा होताना दिसत आहे.