महाराष्ट्र
18058
10
पाथर्डी-शेवगाव तालुक्यात शासनाने दुष्काळ जाहीर करून
By Admin
पाथर्डी-शेवगाव तालुक्यात शासनाने दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत करावी.
भारत राष्ट्र समितीच्या वतीने तहसिलदार यांना निवेदन
पाथर्डी - प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील भारत राष्ट्र समिती पक्षाचे पाथर्डी शेवगाव तालुक्याचे समन्वयक संदिप राजळे तसेच इतर सदस्य यांनी पक्षाच्या वतीने तहसिलदार शाम वाडकर यांना शेतकऱ्यांच्या विविध मागण्याचे निवेदन दिले आहे.
तालुक्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने विविध मागण्याबाबत यावर्षी पर्जन्यमान खूपच कमी झालेले असून खरीप हंगामात शेतकऱ्यांनी पेरणी केलेली पिके जळून खाक झालेली आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले आहे गेल्या ऑगस्ट महिन्यात कुठेही पाऊस झालेला नसून यापुढे पाऊस होण्याबद्दल देखील शंका निर्माण झाली आहे व यामुळे दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. रब्बी हंगामात देखील शेतकऱ्यांची पिके येण्याची कुठल्याही संभावना दिसत नाही म्हणून शासनाने दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याची नितांत गरज आहे.असे मत तालुका समन्वयक संदिप राजळे यांनी व्यक्त केले. भारत राष्ट्र समिती पक्ष यांच्या वतीने विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले. तरी कृपया या मागण्याचे गांभीर आणि विचार करून शेतकऱ्यांच्या शासनाबद्दल न्याय मिळावा ही विनंती दुष्काळ जाहीर करावा शेतकऱ्यांनी सर्व पिके जळून गेलेले असल्याने त्यांना सर्वसाधारण पिक विमा भरपाई मिळावी सरकारने कांदा निर्यातीवर लावलेले निर्यात शुल्क तात्काळ रद्द करावे. दूध दरात वाढ करावी. मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टी व अवकाळी पाऊस यांचे अनुदान शेतकऱ्यांना मिळाले नाही ते त्वरित द्यावे. शेतकऱ्यांची पिके पावसाअभावी जळून गेलेली असल्यामुळे शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावी. शेतकऱ्यांचे विजेचे कनेक्शन तोडू नये. तसेच शेतकऱ्यांची वीज बिल माफ करावे. शेतकरी कुटुंबातील असणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थिनीचे शैक्षणिक शुल्क माफ करावी. पिण्याची पाण्याची समस्या असलेल्या गावात त्वरित टँकर सुरू करावी केंद्राची योजना पीएम किसान व राज्याची योजना नमो सन्मान या योजनेचे हप्ते त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावेत. ज्या गावात जनावरांच्या चाऱ्याची टंचाई निर्माण झाली आहे अशा गावात जनावरांच्या छावणीला चारा उपलब्ध करावा असे विविध मागणीचे पञ असुन या पत्रकावर संदिप राजळे, कृष्णा शिवाजीराव पांचाळ, बाबासाहेब दत्तू साळवे, आजिनाथ बटुळे, पप्पू केदार, प्रकाश बाबर यांच्यासह अनेक शेतकरी यांच्या स्वाक्षरी आहेत.
Tags :
18058
10





