तसेच कापूस, हरभरा, द्राक्ष उत्पादक शेतकरीही अडचणीत आहेत. या पार्श्वभूमीवर सोमवारी राज्यात अवकाळी पाऊस पडला. मंगळवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. त्यामुळे उभ्या पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
अवकाळी पावसाने राज्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी सभागृहात करणार असल्याची ग्वाही विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिली. ते पाथर्डी तालुक्यातील शेतकरी संवाद कार्यक्रमात (अहमदनगर) येथील बोलत होते.
अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, "अवकाळी पावसामुळे निफाड तालुक्यात मोठे नुकसान झाले आहे. सध्या गव्हाची पिके काढणीला आली आहेत. द्राक्ष तोडणीचा हंगाम सुरू आहे. ती बाजारात पाठवायची आहेत. हरभरा, कापूस, कांदा ही पिके अडचणीत आली आहेत. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबत उद्या सभागृहात आवाज उठविणार आहे. तसेच शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यासाठी सरकारकडे मागणी करणार आहे."