दुले चांदगाव येथे साखळी उपोषण
पाथर्डी प्रतिनिधी:
अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसलेले मनोज जरांगे यांना पाठिंबा दर्शविण्यासाठी पाथर्डी तालुक्यातील दुले चांदगाव येथील ग्रामस्थांच्या वतीने मारुती मंदिरच्या वट्यावर मंगळवारपासून (दि. ३१) बेमुदत साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली.
याप्रसंगी "चुलीत गेले नेते आणि चुलीत गेले पक्ष, मराठा आरक्षण एकच आमचे लक्ष" तसेच "एक मराठा लाख मराठा" च्या घोषणा बाजीने परिसर दणाणून गेला.
याप्रसंगी गणेश वाघ यांनी आपले विचार व्यक्त केले, दरम्यान अहमदनगर भाजप ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष गोकुळभाऊ दौंड यांनी सदिच्छा भेट देऊन या साखळी उपोषणाला व आरक्षणाला उत्स्फूर्त पाठिंबा दर्शविला आहे.
यावेळी व्यासपीठावर बंडू साप्ते, गणेश वाघ, सुभाष साप्ते, आदिनाथ माळवे, मेजर साप्ते, अन्वर पठाण, चंद्रकांत पाचरणे, सर्जेराव गर्जे, बाजीराव गर्जे, भाऊसाहेब बांगर, प्रमोद ढोले, उत्तम बांगर, बबन साप्ते यासह मराठा समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते.