महाराष्ट्र
महावितरण कर्मचार्यांचा संप सुरू;29 संघटनांचे कर्मचारी सहभागी
By Admin
महावितरण कर्मचार्यांचा संप सुरू;29 संघटनांचे कर्मचारी सहभागी
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
समांतर वीज वितरण Mahavitran strike परवान्याला विरोध दर्शवित महावितरणच्या कर्मचारी, अभियंता, अधिकारी कृती समितीव्दारे राज्यव्यापी संपाची घोषणा करण्यात आली आहे.
संपात अमरावती परिमंडळातील कर्मचार्यांचाही सहभाग आहे. मंगळवारी संध्याकाळी कर्मचार्यांची विद्युत भवनसमोर द्वारसभा झाली. 3 जानेवारीच्या मध्यरात्रीपासून 72 तासाच्या संपाला सुरूवात झाली आहे. या काळात ग्राहकांच्या सोयीकरिता अमरावती परिमंडळात नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला आहे. सुरळीत वीज पुरवठ्याची सर्व खबरदारी घेतली असली तरी, या काळात ग्राहकांनी सहकार्य करण्याचे आवाहन अमरावती परिमंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
वीज कर्मचार्यांच्या संपात Mahavitran strike महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती कंपनीतील एकूण 29 संघटनांचे कर्मचारी, अभियंते व अधिकारी सहभागी आहेत. अमरावती व यवतमाळ जिल्ह्यात वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी बाह्यस्त्रोत कर्मचार्यांच्या माध्यमातून पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी व माहिती देण्यासाठी विभागीय स्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहे. वीज ही अत्यावश्यक सेवा असल्याने महावितरणकडून सर्व काळजी घेण्यात येत आहे, तथापि या कालावधीत वीज पुरवठा खंडित झाल्यास पूर्ववत होण्यास विलंब होण्याची शक्यता असल्याने ग्राहकांनी संयम पाळून सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. संप काळात कर्मचारी, अभियंते व अधिकारी सहभागी झाल्याने ग्राहकांची गैरसोय होऊ नये, त्यांना तक्रार दाखल करता यावी, तसेच वीज वाहिनी तुटणे, शार्ट सर्किट होणे आदीबाबत माहिती देण्यासाठी चोवीस तास नियंत्रण कक्ष सुरू ठेवण्यात आले आहे. त्यामुळे अमरावती जिल्ह्यातील ग्राहकांनी सह नियंत्रण कक्षाच्या 7875763873 या नंबरवर आणि यवतमाळ
जिल्ह्यातील ग्राहकांनी 7875763099 या नंबरवर माहितीसाठी संपर्क साधावा, असे आवाहन अमरावती परिमंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
पर्यायी व्यवस्था ठेवा
संपकाळात Mahavitran strike वीज पुरवठ्याशी संबंधित सर्व खबरदारी घेतल्या गेली असली, तरी वीज पुरवठा खंडित झाल्यास तो पूर्ववत होण्यास थोडा कालावधी लागेल. या दृष्टीने रूग्णालये किंवा अत्यावश्यक सेवेतील विभागांनी पर्यायी व्यवस्था उपलब्ध ठेवावी, असे आवाहनही महावितरणने केले आहे.
Tags :
743717
10